Home यवतमाळ घाटंजी कृषी उत्पन्न बाजार समितीच्या निवडणुकीत माजी आमदार अण्णासाहेब देशमुख पारवेकर गटाचे...

घाटंजी कृषी उत्पन्न बाजार समितीच्या निवडणुकीत माजी आमदार अण्णासाहेब देशमुख पारवेकर गटाचे 10, तर माजी मंत्री ॲड. शिवाजीराव मोघे, लोणकर गटाचे 8 उमेदवार विजयी..!

140
➡️ कृषी उत्पन्न बाजार समितीची बारा वर्षांची सत्ता संपुष्टात.!
( अयनुद्दीन सोलंकी )
————————-
घाटंजी : यवतमाळ जिल्ह्यातील सर्वात महत्वाची समजली जाणारी घाटंजी कृषी उत्पन्न बाजार समितीच्या अटीतटीच्या निवडणुकीत माजी आमदार अण्णासाहेब देशमुख पारवेकर यांच्या गटाचे 10 उमेदवार, तर माजी मंत्री ॲड शिवाजीराव मोघे, स्व. सुरेशबाबु लोणकर गटाचे 8 उमेदवार निवडून आले आहे. या निवडणुकीत बारा वर्षांची सत्ता संपुष्टात आली आहे, हे येथे उल्लेखनीय.
घाटंजी तालुक्यातील घाटंजी येथील कृषी उत्पन्न बाजार समितीची या वेळची निवडणूक अतितटीची झाली असून या निवडणुकीत यवतमाळचे माजी आमदार अण्णासाहेब देशमुख पारवेकर गटाचे सहकारी संस्था सर्व साधारण मतदार संघातुन सचिन सुभाषचंद्र देशमुख पारवेकर 173 मतें, भैय्या उर्फ नितीन अशोक कोठारी 182 मतें, नंदकिशोर डंभारे 164 मतें, चंद्रप्रकाश खरतडे 170 मतें, सवीद काळे 162 मतें आदीं पांच उमेदवार निवडून आले आहेत. तसेच सहकारी संस्था ईतर मागास प्रवर्गातून संजय गोडे 187 मतें, अनुसुचित जमाती मतदार संघातुन हनुमान मेसराम 178 मतें, सहकारी संस्था महीला राखीव मतदार संघातुन शुभांगी जिरापुरे 172 मतें, देवकी रामधन जाधव 174 मतें, सर्व साधारण ग्रामपंचायत मतदार संघातुन चंद्रकांत इंगळे 187 मतें घेऊन असे 10 उमेदवार निवडून आले आहेत.
तर माजी मंत्री ॲड. शिवाजीराव मोघे, सुरेशबाबु लोणकर गटाचे सहकारी संस्था सर्व साधारण मतदार संघातुन कृषी उत्पन्न बाजार समितीचे माजी सभापती अभिषेक शंकरराव ठाकरे 165 मतें, दि यवतमाळ जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेचे संचालक तथा पांढरकवडा विभागाचे विभागीय अध्यक्ष आशिष सुरेशबाबु लोणकर 165 मतें घेऊन विजयी झाले आहेत. ग्रामपंचायत सर्व साधारण मतदार संघातुन आशिष माधवराव भोयर 185 मतें, ग्रामपंचायत अनुसूचित जाती जमाती मतदार संघातुन कैलास दादाराव कोरवते 206 मतें, सहकारी संस्था आर्थिक दृष्ट्या दुर्बल घटक मतदार संघातुन गुणवंत चंपत लेणगुरे 191 मतें, तर सहकारी संस्था व्यापारी व अडते मतदार संघातुन अकबर युसुफ तंवर 64 मतें, अरविंद सरदार जाधव 64 मतें, हमाल/मापारी मतदार संघातुन रमेश गणपत डंभारे 71 मतें असे 8 उमेदवार निवडून आले आहे.
घाटंजी कृषी उत्पन्न बाजार समिती निवडणूक निर्णय अधिकारी म्हणून रिता निनावे, सहाय्यक निवडणूक निर्णय अधिकारी म्हणून सोनाली थोरात, सहकार अधिकारी श्रेणी 1 – ओ. एम. पहुरकर, सेवानिवृत्त सहकार अधिकारी श्रेणी 1 – बी. के. कुडमथे, संध्या पालकर, सुमेध ठमके, तरोने आदीं अधिकारी व कर्मचाऱ्यांनी निवडणूकीचे काम काज पाहीले.
यावेळी विजयी उमेदवारांची मिरवणूक काढण्यात आली.