Home बुलडाणा ठाणेदार साहेबांनी मुस्लिम रोजेदारांच्या उपस्थितीत सोडला आपल्या जीवनातील पहिला रोजा ,

ठाणेदार साहेबांनी मुस्लिम रोजेदारांच्या उपस्थितीत सोडला आपल्या जीवनातील पहिला रोजा ,

71

 

 

पोलीस ठाण्यातच दिली रोजेदारांना इफ्तार पार्टी ,

 

अमडापुर जिल्हा बुलडाणा

अझर शेख ,

नुकतेच आपल्या देशाने स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव साजरा केला आहे. आपल्या देशाला स्वातंत्र्य करण्यासाठी प्रत्येक जाती धर्माच्या लोकांनि आपल्या प्राणाची आहुती दिली आहे. स्वातंत्र्यापासुन गंगा-जमुना संस्कृती देशात खोलवर रुढली असुन याचेच उदाहरण म्हणजेच अमडापुर पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक नागेशकुमार चतरकर हे होय. नागेशकुमार चतरकर
यांनी मुस्लीम समाजाचे पवित्र असे रमज़ान महिन्याचा दिवसभर उपवास धरुन इश्वराच्या दरबारी शांती व जातीय सलोख्यासाठी प्रार्थना केली आहे. नागेशकुमार चतरकर यांनी रमज़ान चा रोज़ा पाळुन जातीय सलोख्याचे जे उदाहरन दिले त्या बाबत त्यांचे सर्वत्र कौतुक अभिनंदन होत आहे. दिनांक 16 एप्रिल रविवारला पोलीस स्टेशन आवारात मुस्लीम रोज़ेदारांसाठी इफ्तार पार्टीचे आयोजन सुध्दा या वेळी त्यांनी केले होते मुस्लिम धर्मानुसार प्रत्येक सुदृढ, निरोगी व्यक्तीवर रोजा ठेवणे अनिवार्य आहे, रोझा म्हणजे चौदा ते सोळा तास अन्न, पाणी त्याग करून रोजा ठेवल्यास आरोग्याच्या दृष्टीने खूप फायदेशीर महत्वाचे ठरते परंतु फक्त उपाशी राहणे म्हणजे रोजा नव्हे, रोजा अर्थात उपवास ठेवतांना डोळे, कान,नाक , हात,पाय, मन, प्रत्येक अवयवाचा उपवास रोजा असतो आपल्या शरीरातील अवयवांना प्रत्येक अशा वाईट सवयी,वाईट कार्य, ज्या पासुन आपले व मानव जातीला त्रासदायक, घातक ठरेल अश्या प्रत्येक वाईट सवई, दृष्ट कार्य यापासून दूर राहणे हे पण रोज्याचा चा एक भाग आहे. विविधतेत एकता असलेला लोकशाही प्रदान आपल्या भारतात प्रत्येक जाती धर्माचे लोक गुण्यागोविंदाने राहतात, प्रेम,आपुलकी,सद्भावना हे गुण अंगी असलेले शांतीप्रिय भारतीय लोक हे प्रत्येक धर्माच्या लोकांचे व त्यांच्या आस्थेचा सन्मान करतात सुखा दुःखात मदतीला धाऊन येतात, धार्मिक सामाजिक उत्साहात आनंदाने सहभागी होतात, ही एकता बंधुत्व टिकून रहावी त्याला कोणतेही गालबोट लागू नये यासाठी कोणतीही तक्रार न करता चोवीस तास झटणारा एक वर्ग आहे. तो म्हणजे पोलीस प्रशासन,ज्याची असण्याची जाणीव, त्याचे महत्व जरी कळत नसले तरी, जेंव्हा कुठे सामाजिक एकता भंग, करून जातीय, धार्मिक तेढ निर्माण करण्याचा प्रयत्न केला जातो त्यावेळी तुमच्या समोर तुमचा रक्षक बनून ठाम उभा राहतो तो म्हणजे पोलीस प्रशासनाचा प्रत्येक कर्मचारी अधिकारी होय,सर्वधर्मीय प्रेम, बंधुभाव, सद्भावना,एकता कायम रहावी या साठी अमडापुर चे ठाणेदार यांनी आपला पहिला रोजा ठेवला व असंख्य मुस्लिम बांधवांच्या उपस्थितीत
रोजा सोडन्यासाठी ( इफ्तारी) साठी पोलीस स्टेशन परिसरात शेकडो मुस्लिम रोजेदार हिंदू,मुस्लिम, बौद्ध बांधव उपस्थित होते, रोजा सोडण्यासाठी इफ्तारी ची व्यवस्था पोलीस स्टेशन मध्ये करण्यात आली होती
या वेळी चिखली तालुक्यातील सर्वात
मोठे गाव असलेले अमडापुर पोलीस स्टेशन चे कर्तव्यदक्ष
ठाणेदार नागेशकुमार चतरकर
पीएसआय पांडूरंग शिंदे,गोपनीय विभागाचे रणजित सरोदे, तसेच गजानन राजपुत,जाधव,यांनी सुद्धा कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी अथक प्रयत्न केले ,