Home यवतमाळ घाटंजी पंचायत समितीच्या वादग्रस्त गट विकास अधिकारी सोनाली माडकर एक महिना लोटुनही...

घाटंजी पंचायत समितीच्या वादग्रस्त गट विकास अधिकारी सोनाली माडकर एक महिना लोटुनही पन्हाळा पंचायत समितीत रुजु झाले नाही..!

162
( अयनुद्दीन सोलंकी )
———————–
घाटंजी, 18 एप्रिल : शासनाच्या आदेशानुसार घाटंजी येथील गट विकास अधिकारी सोनाली माडकर यांची पन्हाळा पंचायत समिती (जिल्हा कोल्हापूर) येथे बदली होऊन एक महिना लोटूनही पदस्थापना झालेल्या जागेवर अद्याप ही त्या रुजू न झाल्याने घाटंजी पंचायत समिती न सोडण्याचे काय कारण आहे, हे सद्यातरी गुलदस्त्यात आहे.
घाटंजी येथील वादग्रस्त गट विकास अधिकारी सोनाली माडकर यांची घाटंजी वरून कोल्हापूर जिल्ह्यातील पन्हाळा येथे रिक्त पदावर बदली झाली. त्या संदर्भात शासन आदेश क्रमांक मविसे 1022 / प्र. क्र 168 / 2022 अस्था 3 दि. 16 मार्च 2023 रोजी राज्याचे अवर सचिव डॉ. वसंत माने यांचे आदेशानुसार बदली करण्यात आली. मात्र, एक महिना लोटुनही गट विकास अधिकारी सोनाली माडकर ह्या पन्हाळा येथील पंचायत समितीचा प्रभार घेतलेला नाही, हे विशेष.
विशेष म्हणजे घाटंजी पंचायत समितीच्या वादग्रस्त गट विकास अधिकारी सोनाली माडकर यांची 16 मार्च 2023 रोजी बदली झालेली असतांना त्यांनी आपला पदभार स्वीकारलेला नाही, हे येथे उल्लेखनीय.
घाटंजीच्या गट विकास अधिकारी सोनाली माडकर यांच्या बाबत घाटंजी तालुक्यातील जिल्हा परिषद सदस्य, पंचायत समिती सदस्य, सरपंच या सह घाटंजी तालुक्यात इतर नागरिकांनी शासकीय कामात अनियमितता केल्याचा ठपका ठेऊन त्यांच्या विरोधात शासन, मंत्रालय, जिल्हा परिषद व इतर संबंधित विभागाकडे गंभीर स्वरुपाच्या तक्रारी करण्यात आल्या होत्या. मात्र, राजकीय दबावाखाली सदर प्रकरणाची चौकशी करण्यात आलेली नाही.
घाटंजी येथील गट विकास अधिकारी सोनाली माडकर यांनी आपल्या नवीन पदाचा पदभार त्वरित स्वीकारावा तसेच अनधिकृत रजेवर जावू नये. संबधित मुख्य कार्यकारी अधिकारी पदस्थापना झालेल्या अधिकारी यांना त्यांच्या नियुक्तीच्या जागी तत्काळ रुजू होण्यास सांगावे. व पद भार स्वीकरण्याचा दिनांक, शासनास कळवावे असे आदेशात नमूद करण्यात आले आहे. गट विकास अधिकारी हे विहित कालावधीत पदस्थापना झालेल्या पदावर रुजू न झाल्यास उक्त अधिकारया विरुदध संबधित मुख्य कार्यकारी अधिकारी यांना विभागिय आयुक्तामार्फत शिस्तभंग विषयक कार्यवाहीचा प्रस्ताव शासाकडे सादर करावा, असे स्पष्ट पणे आदेशात नमूद करण्यात आले आहे.
परंतु एक महिना लोटूनही गटविकास अधिकारी सोनाली माडकर ह्या कार्यमुक्त झालेले नाही. तरी जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी यांनी या बाबत दखल घेऊन घाटंजी पंचायत समितीच्या गट विकास अधिकारी सोनाली माडकर यांना तत्काळ रिलीव्ह करण्यात यावे, अशी मागणी होत आहे.