
( अयनुद्दीन सोलंकी )
घाटंजी, 18 एप्रिल : घाटंजीच्या तहसीलदार पूजा मातोडे यांची चांदूर रेल्वे इथे बदली झाल्याबद्दल घाटंजी तहसीलचे कर्मचारी व रास्त भाव दुकानदार यांचेकडून निरोप देण्यात आला. यावेळी कार्यक्रमाचे अध्यक्षस्थानी प्रभारी तहसीलदार संजय हॊटे हे होते. कृषी अधिकारी गजानन इंगोले, शिक्षक प्रशांत उगले, राजेंद्र गोबाडे, ठाणेदार सुषमा बाविस्कर व अधिकारी कर्मचारी मंचावर उपस्थित होते.

याप्रसंगी कर्मचारी, रास्त भाव दुकानदार यांनी आपले अनुभव व्यक्त केले. या प्रसंगी राजेंद्र गोबडे, प्रशांत उगले व ठाणेदार सुषमा बाविस्कर व प्रभारी तहसीलदार संजय हॊटे यांनी आपले मत व्यक्त केले.
यावेळी तहसीलदार पूजा मातोडे यांनी सत्कार प्रसंगी, घाटंजीतील जनतेने व कर्मचारी यांनी चांगले सहकार्य केले पुढील काळात समाजाच्या सर्व घटकासाठी काम करणार आहे.
यावेळी रास्त दुकानदार ,संस्था व कर्मचारी यांनी पूजा मातोडे यांचा शाल, श्रीफळ व पुष्पगुच्छ देऊन सत्कार केला. यावेळी मोठया संख्येने कर्मचारी व रास्त भाव दुकानदार उपस्थित होते. कार्यक्रमाचे संचालन पुरवठा निरीक्षक एस. जी. भगत यांनी केले.
या कार्यक्रमासाठी राजू वानखडे, विवेक देशपांडे, अजय भगत, सचिन बागडे, निलेश पोटे, अविनाश वाकोडे, अमरदीप मुनेश्वर, संतोष कैलासवार, संजय हूड, राजू पेंदोर, सचिन सोनुले, अभिजित तिवारी, शुभांगी धोटे, नीलिमा गोहने, कल्पना वाघाडे, जयश्री पचारे आदींनी परिश्रम घेतले.











































