Home बुलडाणा न्याय मागण्यासाठी गेलेल्या रोजेदारांना पोलीसांकडून दंडुक्यांची इफ्तार पार्टी ..?

न्याय मागण्यासाठी गेलेल्या रोजेदारांना पोलीसांकडून दंडुक्यांची इफ्तार पार्टी ..?

206

बुलडाणा ,

साखरखेर्डा पोलीस स्टेशन तर्फे दरवर्षी पवित्र रमजान महिन्यात मुस्लिम रोजे करणारनाऱ्यांना इफ्तार पार्टीचे आयोजन केले जात होते. मात्र यावर्षी रोजेदारांना काठ्यांची इफ्तार पार्टी देण्यात आली. त्यामुळे इफ्तार पार्टीचा विषय चर्चेचा ठरत आहे. ,नव्हेतर सामान्य नागरिकांतही ही चर्चा ऐरणीवर आली आहे.

मिळालेल्या माहिती नुसार साखरखेर्डा येथे दि , 13 रोजी शेख आदिल शेख अकील या युवकाचा खून झाल्याची घटना घडली. त्या प्रकरणी पोलिसांनी त्याच रात्री यातील मुख्य आरोपी मारेकरी प्रशांत योगेंद्र गवई यास जेरबंद केले. मात्र याचवेळी घटनावेळी उपस्थित हनान शाह, यांच्यासह कामे आदिंना चौकशी करून सोडून देण्यात आले. तर या घटनेतील मृतक शेख आदिल याचा दफनविधी दि. 14 एप्रिल रोजी पार पडल्यानंतर काही प्रतिष्ठित मुस्लिम समाज बांधवांनी सदर घटनेची योग्य चौकशी करण्यात यावी या मागणीचे निवेदन देण्यासाठी पोलीस ठाण्यात गेले असतांनाच मात्र निरपराध मुस्लिम बांधवावर पोलिसांनी लाठीमार सुरू केला. अचानक झालेल्या लाठी हल्ल्यात पळापळीत अनेकांना जखमी व्हावे लागले. अन, त्याच रात्री जिल्हा पोलीस अधीक्षक सारंग आवाड , स्थानिक गुन्हा शाखेचे अशोक लांडे , उपविभागीय पोलीस अधिकारी यामावर यांनी येथील पोलीस ठाण्यात भेट देऊन परिस्थितीचा आढावा घेतला. परंतु, दुसऱ्याच दिवशी पोलिसांनी न्याय मागण्यासाठी गेलेल्या लोकांवर गुन्हे दाखल केले असल्याचे दिसून आले आहे.

मग त्या पोलिसांवर कार्यवाही कोण करणार ?

निवेदन देण्यासाठी गेलेल्या निष्पाप मुस्लिम बांधवावर पवित्र रमजान महिन्यात बेछूट लाठी हल्ला करण्याऱ्या पोलिसांवर प्रशासकीय कार्यवाही कोण करणार? जिल्हा पोलीस अधीक्षक या कडे लक्ष देणार का ? असा प्रश्न मुस्लिम समाज बांधव करीत आहेत. पोलिसांनी या प्रकरणी ज्या 21 समाज बांधवांवर गुन्हे दाखल केले, त्यातील काहीजण त्यावेळी उपस्थितही नव्हते. ह्या संपूर्ण प्रकरणाची सखोल चौकशी करण्यात यावी, अशी मागणी व्यक्त करण्यात येत आहे.