Home पालघर लोकनियुक्त सरपंच वैशाली अशोक धोडी यांच्या हस्ते महामानवाला अभिवादन

लोकनियुक्त सरपंच वैशाली अशोक धोडी यांच्या हस्ते महामानवाला अभिवादन

87

*जव्हार* :- *सोमनाथ टोकरे*

जव्हार तालुक्यातील नामावंत ग्रुप ग्रामपंचायत कौलाळे येथे विश्वरत्न, जग ज्ञानी, महामानव,भारतरत्न, क्रांतीसुर्य, ज्ञानाचा अथांग महासागर, परमपूज्य, बोधिसत्व,डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या 132 व्या जयंती निमित्ताने प्रतिमेचे पूजन करून पुष्पहार अर्पण करून सरपंच वैशाली अशोक धोडी यांच्या हस्ते महामानवाला अभिवादन आले.
भारतरत्न डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्या मुळे आपल्या सारख्या माणसाला माणूस म्हणून जगण्याचा अधिकार मिळाला शिक्षणाची अखंड पेटी मशाल हाती घेऊन,शिका संघटित व्हा, संघर्ष करा, मुखी नारा, राज्यघटनेचा खरा शिल्पकार महामानव भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांना मानाचा मुजरा करते. 14 एप्रिल या सोनेरी दिवसाचे समाजाच्या आणि देशाच्या दृष्टीने अत्यंत महत्त्व आहे. देशातील कोट्यावधी दिन दुबळ्यांसाठी तसेच देशासाठी हा दिवस फार आनंदही आहे. या दिवशी दिवसभर मोठ्या उत्साहाने खेड्यापाड्यापासून ते दिल्ली पर्यंत डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांची जयंती मोठ्या उत्साहाने साजरी केली जाते. डॉक्टर बाबासाहेबांमुळे आपल्या समाजामध्ये ताठ मानेने जीवन जगण्याचा अधिकार समता,बंधुत्वता,स्वतंत्र, कायदा आपल्याला अधिकार मिळवून दिले . ग्रुप ग्रामपंचायत कौलाळे प्रत्येक घरापर्यंत बाबासाहेबांचे विचार बाबासाहेबांचे प्रतिमा असणे तसेच महाराष्ट्र शासन निर्णय प्रमाणे प्रत्येक जिल्हा परिषद केंद्र शाळा पवार पाडा या कार्यक्षेत्रातील सर्व जिल्हा परिषद शाळांमध्ये, तसेच अंगणवाडीमध्ये सर्व सरकारी कार्यालयामध्ये मोठ्या उत्साहाने जयंती साजरी करण्यात यावे. महापुरुषांचे विचार, हे सर्व विद्यार्थी पर्यंत घरापर्यंत महापुरुषांचे विचार पोहोचवणे खूप गरजेचे आहे. असे नमूद करत ग्रुप ग्रामपंचायत कार्यालय कौलाळे येथे महामानवाला अभिवादन करून सरपंच यांनी बोलताना सांगितले.
यावेळी तंटामुक्त अध्यक्ष राजेश वातास, प्रदीप निकुळे ग्रामपंचायत शिपाई परशुराम बाबरे, दिनेश कलिंगडे, अशोक धोडी, सोनी मुर थडे, रंजना टोकरे, केशव घाणे माजी सरपंच, विष्णू रंधा, शंकर दखणे पदाधिकारी व ग्रामस्थ उपस्थित होते.