Home विदर्भ आजनसरा येथे श्री संत भोजाजी महाराज पुण्यतिथी महोत्सवाला सुरुवात…!

आजनसरा येथे श्री संत भोजाजी महाराज पुण्यतिथी महोत्सवाला सुरुवात…!

406

प्रतिनिधी/प्रमोद झिले,वर्धा हिंगणघाट
विदर्भाची पंढरी म्हणून मानल्या जाणाऱ्या व पूरणपोळीसाठी प्रसिद्ध असलेल्या श्री क्षेत्र आजनसरा येथे दरवर्षी प्रमाणे संत भोजाजी महाराज पुण्यतिथी महोत्सवाला दि.१०एप्रिलपासून सूरूवात झाली असून १७ एप्रिल पर्यंत विविध धार्मिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले.कै.ह.भ.प.देवाजी महाराज आजनसरा यांनी शके १८७७ इसवी सन १९५५ सालापासून आजनसरा येथील भाविक भक्तांच्या सहकार्याने या पूण्यतिथी महोत्सवाला सुरुवात केली.१०एप्रिलला रामा बापू पर्बत यांच्या हस्ते कलश स्थापना करण्यात आली.१७ एप्रिलला भव्य महाप्रसादाचे आयोजन करण्यात आले व त्यानंतर रात्री ९ वाजता संत भोजाजी महाराजांच्या पालखीची भव्यदिव्य मिरवणूक व दिंडी होणार आहे.या दिवशी परिसरातील व बाहेरील जिल्ह्यातील असंख्य भक्तांची मांदियाळी श्री संत भोजाजी महाराजांच्या पालखी सोहळा बघावयास येतात.श्री संत भोजाजी महाराज व तपस्वी संत सोनामाता यांच्या पदस्पर्शाने पावन झालेल्या व विदर्भाची पंढरी म्हणून नावारूपास आलेले आजनसरा हे गाव प्रसिद्धीस आले.श्री संत भोजाजी महाराजांच्या भक्तीरसात आकंठ बुडालेले भाविक भक्त पूण्यतिथी महोत्सव मोठ्या उत्साहात व भक्तीभावाने साजरा करतात.