Home महाराष्ट्र शिवशाही फाउंडेशन,भारत तर्फॆ विश्वरत्न डॉ.बाबासाहेब आंबेडकर जयंतीनिमित्त कराड तालुक्यामध्ये विविध उपक्रम.

शिवशाही फाउंडेशन,भारत तर्फॆ विश्वरत्न डॉ.बाबासाहेब आंबेडकर जयंतीनिमित्त कराड तालुक्यामध्ये विविध उपक्रम.

279
विश्वरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंती चे आवचित्य साधून कराड तालुक्यामध्ये विविध उपक्रम राबविण्यात आले.यामध्ये शैक्षणिक साहित्य वाटप, गुणवंत विद्यार्थी सत्कार, संविधान वाटप, संविधान जनजागृती अभियान असे उपक्रम राबविण्यात आले.यावेळी छत्रपती शिवाजी महाराज,महात्मा फुले , शाहू महाराज व डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांचे विचार पुढे ठेवून जाती पातीला मूठमाती

देऊयात हा संदेश समाजात रुजविण्यात आला.शिवशाही फाउंडेशन भारत तर्फ कराड शहरात विविध ठिकाणी विश्वरत्न डॉ.बाबासाहेब यांना अभिवादन करण्यात आले.नांदगाव मध्ये न्यू इंग्लिश स्कूल मध्ये BYJU’Sचे 7 शैक्षणिक सॉफ्टवेअर देण्यात आले. शिखरे वस्ती (कराड) येथे गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार करण्यात आला यावेळी सातारा जिल्हाध्यक्ष रोहित सूर्यवंशी म्हणाले सर्वांनी बाबासाहेबांच्या विचारावर चालावे. शिका संघटित व्हा व संघर्ष करा हा नारा बहुजनांच्या प्रगतीचा मार्ग आहे.सर्वांनी शिक्षण घेणे व शिक्षणासाठी मदत करणे हे आपले परम कर्तव्य आहे. बाबासाहेबांच्या विचाराचे पाईक होऊन जगण्यातच आपल्या जीवनाचे सार्थक आहे. आजच्या काळात शिक्षणाशिवाय पर्याय नाही असे प्रतिपादन केले. ‘हर घर संविधान’ मोहीम अंतर्गत कराड शहरात विविध ठिकाणी संविधान वाटप करण्यात आले.यावेळी हर घर संविधान मोहीमचे प्रमुख व प्रदेश संयोजक प्रा.डॉ.अमितराज माने संविधान वाटप करताना म्हणाले,” देशाचे संविधान हे सर्वोच्च आहे.देशातील राजकर्ते जरी विकले गेले तरी देशाच्या संविधानाला काही होणार नाही. कारण बाबासाहेबांचा देशातील जनतेवर विश्वास होता.तो विश्वास आपण सर्वानी सार्थ ठरवूया.संस्थेचे प्रदेश उपाध्यक्ष श्री.ॠषीकेश पाटील यांनी भविष्यात संस्थेची विविध मोहीमची माहीती दिली. यावेळी संस्थेचे संस्थापक-राष्ट्रीय अध्यक्ष बाळाराम माडकर ,प्रदेशाध्यक्ष प्रा.श्री.विजय नवले,प्रदेश संयोजक प्रा.डॉ.अमितराज माने,प्रदेश उपाध्यक्ष श्री.ॠषीकेश पाटील, प्रदेश सचिव ऋतुराज पाटील, जिल्हाध्यक्ष रोहित सुर्यवंशी,अमोल सोनवले,प्रकाश जानराव,राजू रणशिंगारे,पिनू भोसले, सुदर्शन नागटिळक, तुकाराम माडकर, तेजस सोनवले, रत्नाकर कांबळे व इतर पदाधिकारी उपस्थित होते.