
सहा जखमी लहान मुलांचा समावेश ,
अमीन शाह ,
बुलडाणा
औरंगाबाद वरून शेगावला जात असलेल्या भरधाव इर्टिगा गाडीचा मेहकरजवळील शिवनी पिसा गावाजवळ झालेल्या भीषण अपघातात सहा प्रवाशांचा दुर्देवी मृत्यू झाला आहे. कार भरधाव असल्याने ती कठड्यावर धडकून पलटी झाली. आज सकाळी ही दुर्देवी घटना घडली. मृतांमध्ये महिला व लहान मुलांचा समावेश आहे. तातडीने बचावकार्य राबवित जखमींना मेहकर येथे हलविण्यात आले आहे. या अपघातात तिघे प्रवासी गंभीर जखमी आहेत. अपघात इतका भीषण होता, की कारचा अक्षरशः चक्काचुर झाला होता. समृद्धी महामार्ग विदर्भाची भाग्यरेषा बनेल की नाही, हे अद्याप निश्चित नसले तरी, सद्या तरी तो मृत्यूची रेषा बनला आहे. उद्घाटन झाल्यापासून आतापर्यंत तब्बल 40 भीषण अपघात झाले असून, त्यात अनेकांचे बळी गेले आहेत.
मिळालेल्या माहितीनुसार, अपघातग्रस्त इर्टिगा कार नंबर mh 20 fu 89 62 औरंगाबाद छत्रपती संभाजीनगरहून शेगावला जात होती. गाडीत एकूण ९ प्रवासी होते. मेहकरजवळ शिवनी पिसा गावाजवळ नागपूर कॉरिडॉरवर गाडीचा अपघात झाला. अपघातात २ मुले ४ महिलांचा मृत्यू झाला आहे. तर ३ जण गंभीर जखमी झाल्याची माहिती आहे. अपघाताची माहिती मिळाल्यानंतर पोलीस घटनास्थळी दाखल झाले. जखमींवर मेहकर येथील रुग्णालयात उपचार सुरू आहेत. वेगात असलेली गाडी अनियंत्रित झाल्याने हा अपघात झाल्याची प्राथमिक माहिती समोर येत आहे. भरधाव वेगात असलेली आर्टिगा कार अचानक चालकाकडून अनियंत्रित झाली. त्यामुळे कार पलटी झाली. हा अपघात इतका भीषण होता की, यात कारचा चुराडा झाला. या अपघातात तीन महिला आणि दोन लहान मुलांचा जागीच मृत्यू झाला, तर उपचारादरम्यान एक प्रवासी दगाविल्याचे सांगण्यात आले. अधिक तपास पोलिस करत आहेत.
दरम्यान, 701 किलोमीटर लांबीचा नागपूर ते मुंबई हा समृद्धी महामार्ग गेल्या काही दिवसांपासून अपघातांमुळेच चर्चेत आहे. गेल्या वर्षी 11 डिसेंबर 2022 रोजी नागपूर ते शिर्डी या महत्त्वाच्या टप्प्याचे लोकार्पण झाले होते. राज्याच्या 10 जिल्ह्यांतून जाणाऱ्या या महामार्गावर आतापर्यंत 40 भीषण अपघात झाले आहेत, त्यात अनेकांचा बळी गेला असून, शेकडो जायबंदी झाले आहेत. समृद्धी महामार्गावरील वेगमर्यादा ताशी 120 किलोमीटर असल्यामुळे गाड्यांवरील नियंत्रण सुटल्याने हे भीषण अपघात होत आहेत.
झालेल्या या अपघातात मृतकांची नावे ,
1)श्रीमती हौसा बाई भरत बर्वे (65)
2) श्रद्धा सुरेश बर्वे (30),
3) किरण राजेंद्र बोरडे (30)
4) भाग्यश्री किरण बोरडे (21)
5) प्रमिला राजेंद्र बोरडे (52)
6) जानवी सुरेश बर्वे (06 )
जखमींची नावे
1) नम्रता रविंद्र बर्वे(32)
2) रुद्र रविंद्र बर्वे (12)
3) यश रविंद्र बर्वे (10)
4) सौम्या रविंद्र बर्वे (4)
5) अमित सुरेश बर्वे (3)
6) सुरेश भरत बर्वे 35) सर्व जखमींना मेहकर ग्रामीण रुग्णालयात नेण्यात आले गंभीर जखमींना बुलडाणा व औरंगाबाद येथील रुग्णालयात पुढील उपचारार्थ नेण्यात आले आहे ,