Home बुलडाणा खासगी रुग्णालयांमध्ये रुग्ण हक्कांची सनद लावा

खासगी रुग्णालयांमध्ये रुग्ण हक्कांची सनद लावा

68

चंद्रकांत खरात यांची आरोग्यमंत्र्यांकडे मागणी

प्रतिनिधी:-रवि आण्णा जाधव

देऊळगावराजा :-जिल्ह्यातील सर्व खासगी रुग्णालयांमध्ये रुग्ण हक्कांची सनद दर्शनी भागात लावण्यात यावी, अशी मागणी जिल्हा ग्राहक संरक्षण परिषदेचे अशासकीय सदस्य चंद्रकांत ज्ञानदेव खरात यांनी केली आहे.
या संदर्भात खरात यांनी आरोग्यमंत्री. जिल्हाधिकारी, उपविभागीय अधिकारी, जिल्हा शल्य चिकित्सक आणि जिल्हा आरोग्य अधिकाऱ्यांना निवेदन दिले आहे. निवेदनात म्हटले आहे की, खासगी रुग्णालयांनी रुग्ण हक्कांची सनद व दर पत्रकाची माहिती दर्शनी भागात लावणे कायद्याने बंधनकारक आहे. परंतु, बहुतांश रुग्णालयांमध्ये सनद दर्शनी भागात लावलेली नाही. अनेक खासगी प्रॅक्टीस करणाऱ्या डॉक्टरांनी व रूग्णालयांनी या नियमाला हरताळ फासला आहे. लोकांच्या आरोग्याशी थेट संबंध असणाऱ्या डॉक्टरांनी नियम धाब्यावर बसवणे चिंताजनक असून त्यामुळे केंद्रीय आरोग्य मंत्रालयाने जून २०१९ मध्ये सर्व राज्यांमधील खासगी व सरकारी रुग्णालयांमध्ये रुग्ण हक्कांची सनद दर्शनी भागात लावण्याचे आदेश जारी केले होते. राष्ट्रीय मानवाधिकार आयोगाने सप्टेंबर २०२० आणि मे २०२१ मध्ये याविषयी आदेश निर्गमित केले. तसेच राज्याच्या आरोग्य विभागाने सर्व जिल्ह्यांना आदेश दिले होते.
जिल्ह्यातील सर्व नोंदणीकृत खासगी रुग्णालयांत १५ दिवसांच्या आत रुग्ण हक्कांची सनद दर्शनी भागात लावण्यात यावी. तसेच आदेशाचे पालन न करणाऱ्या रुग्णालयांचा परवाना रद्द करण्यात यावा, अशी मागणी चंद्रकांत खरात यांनी या निवेदनाद्वारे केली आहे.