Home यवतमाळ घाटंजी तहसील पथकाची अवैध गौणखनिज विरुद्ध कारवाई..!

घाटंजी तहसील पथकाची अवैध गौणखनिज विरुद्ध कारवाई..!

118

(अयनुद्दीन सोलंकी )

————————-
घाटंजी : घाटंजी तहसिल कार्यालयातील पथकाने अवैधरीत्या वाळू वाहतूक करणा-यावर दि 1 मार्चच्या रात्री कारवाई करून मुद्देमालासह ट्रक्टर जप्तीची कारवाई करण्यात आली. सदर ट्रॅक्टर घाटंजी पोलीस ठाण्यात लावण्यात आला आहे.

घाटंजीच्या तहसीलदार पुजा माटोडे यांचे मार्गदर्शनाखाली घाटंजी तालुक्यात वाळूचा अवैध उपसा व वाहतूकीवर नियंत्रण ठेवून कारवाई करण्यासाठी निवासी नायब तहसीलदार यांचे नियंत्रणात पथक तयार करण्यात आले होते.

दि. 1 मार्च रोजी निवासी नायब तहसीलदार दिलीप राठोड, महसुल नायब तहसीलदार माला गेडाम, मंडळ अधिकारी शिंदे, तलाठी भारत लढे यांच्या पथकाला तालुक्यातील किन्ही येथे एक‌ विना क्रमांकाचा ट्रॅक्टर अवैधरीत्या वाळू वाहतूक करीत असतांना आढळून आले. तसेच ट्रॅक्टर पकडल्या जाईल या कारणाने वाहन चालक याने ट्रक्टरची बॅटरी काढून तसेच ट्रॅक्टर पथकाने नेवू नये म्हणून ट्रॅक्टर मध्ये बिघाड करून पळून गेला. या वेळी घटनास्थळी घाटंजी पोलीस स्टेशनच्या ठाणेदार तथा सहाय्यक पोलीस निरीक्षक सुषमा बाविस्कर यांचेसह तहसील कार्यालयातील पथक घटनास्थळी उपस्थित झाले. तसेच तहसीलदार पुजा माटोडे, तलाठी तायडे हे देखील घटनास्थळी दाखल झाल्यानंतर रात्री उशिरा सदर ट्रक्टर मुद्दे मालासह ताब्यात घेवून घाटंजी पोलीस स्टेशन ठाण्यात लावण्यात आला आहे.

या कारवाईमुळे घाटंजी तालुक्यातील अवैध वाळू व्यवसाय करणा-यांचे धाबे दणानले आहे.