Home जळगाव पाचोर्यात रात्री दोन वाजता रक्तदान करुन वाचविले आईचे प्राण

पाचोर्यात रात्री दोन वाजता रक्तदान करुन वाचविले आईचे प्राण

20
0

पाचोरा : (शाह एजाज़ गुलाब)

शहरातील एका हॉस्पिटल मध्ये बाळंतपणासाठी दाखल झालेल्या महीलेचे रात्री दोन च्या सुमारास रक्तदान करुन वाचविले प्राण या रक्तदात्यांचे कौतुक होत आहे.

रक्तदान हे श्रेष्ठदान आहे केव्हा कुणाला रक्ताची गरज पडु शकेल हे सांगणे कठीण आहे. दिवसभर कधीही रक्त मिळणे हे सहज शक्य आहे मात्र अंत्यत दुर्मिळ रक्तगट ओ निगेटिव्ह आणि तेही रात्री च्या सुमारास मिळेल याची कधीच श्वासती नसते अशातच भडगाव तालुक्यातील पिचर्डे येथील छाया गायकवाड ही माता बाळंतपणासाठी येथील लिलावती हॉस्पिटल ला दाखल झाली. घरात अठराविश्व दारिद्र्य आणि रुग्णा सोबत कुणीही नाही अशात तिला रक्ताची आणि तोही दुर्मिळ रक्तगटाची गरज पडली तेव्हा हॉस्पिटल प्रशासनापुढे प्रश्न पडला इतक्या रात्री कुणाशी संपर्क साधला पाहिजे तेव्हा कॉंग्रेस तालुका अध्यक्ष सचिन सोमवंशी यांच्याशी रात्री दिड वाजेच्या सुमारास संपर्क केला असता ते तातडीने हॉस्पिटल मध्ये उपस्थिती होवुन त्यांनी त्यांच्या संपर्कातील कार्यकर्तेंशी संपर्क करुन तात्काळ रात्री दोन वाजता सामाजिक कार्यकर्ते सुनिल माळी हे गाढ झोपेत असताना उठुन आले आणि रक्तदान केले. रक्तदात्यांच्या रक्ताने छाया गायकवाड चा प्राण डॉ वैभव सुर्यवंशी वाचवु शकले आणि एका सुखरूप बाळाला तिने जन्म दिला. यावेळी सचिन पाटील, ललित पाटील, शुभम मराठे उपस्थितीत होते. दुसर्‍या दिवशी छाया गायकवाड यांच्या नातेवाईकांनी कॉंग्रेस अध्यक्ष सचिन सोमवंशी यांच्या सह रक्त दाता ची भेट घेऊन आभार मानले.

रक्तदान हे श्रेष्ठदान आहे याचा पुन्हा प्रत्यय आला. रक्तदानासाठी कोणतेही वेळ नसते हेही सिद्ध झाले.

Previous article१६ हजाराची लाच घेताना पोलिस आणि त्याचा पंटरला अटक
Next articleघाटंजी तहसील पथकाची अवैध गौणखनिज विरुद्ध कारवाई..!
भारत सरकारने फेब्रुवारी 2021 पासून अधिसूचित केलेल्या नव्या माहिती तंत्रज्ञान (मध्यस्थ मार्गदर्शक सूचना आणि डिजिटल माध्यमांसाठीची आचार संहिता) नियम 2021 अंतर्गत असलेल्या डिजिटल माध्यमांसाठीच्या आचार संहितेचे आम्ही पालन करतो. तरीही एखाद्या बातमीविषयी आपली तक्रार असल्यास आमच्या वेब माध्यमचे तक्रार निवारण अधिकारी आणि स्वनियमन संस्थेकडे विहित नमुन्यात अर्ज करू शकता. आपल्या तक्रारीचे निराकरण केले जाईल.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here