Home जळगाव १६ हजाराची लाच घेताना पोलिस आणि त्याचा पंटरला अटक

१६ हजाराची लाच घेताना पोलिस आणि त्याचा पंटरला अटक

76

बोदवड :{आनंद पाटील}
जलगांव जिल्ह्यातील बोदवड येथे खंडणीच्या गुन्ह्यात मदत करण्यासाठी १६ हजार रूपयांची लाच स्वीकारणाऱ्या पोलीस कर्मचार्याला त्याच्या पंटरसह 25 फेब्रुवारीला रंगेहाथ अटक करण्यात आली आहे.
या संदर्भातील वृत्त असे की बोदवड पोलीस स्थानकात एका व्यक्तीच्या विरोधात खंडणीचा गुन्हा दाखल होता. या प्रकरणी मदत करण्याच्या नावाखाली हवालदार वसंत नामदेव निकम यांनी त्या व्यक्तीकडे २० हजार रूपयांची लाच मागितली होती. तडजोड करून १६ हजार रूपयांवर निश्चीत झाला.
दरम्यान संबंधीत व्यक्तीने लाचलुचपत प्रतिबंधक खात्याकडे तक्रार केली. सापळा रचुन यानुसार पथकाने तहसील कार्यालयाच्या आवारात हवालदार वसंत नामदेव निकम आणि त्यांचा पंटर एकनाथ कृष्णा बाविस्कर यांना रंगेहात अटक केली. दोघांना ताब्यात घेउन गुन्हा नोंदविण्यात आला आहे.
सदर कारवाई ही लाचलुचपत प्रतिबंधक खात्याचे उपअधीक्षक शशीकांत पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली निरिक्षक संजोग बच्छाव आणि त्यांच्या सहकाऱ्यांनी केली. या धडक कारवाईमुळे परिसरात खळबळ उडाली आहे.