Home जळगाव ६० वर्षीय वृद्धाचा जळगावच्या मेहरूण तलावात बुड़ुन मृत्यू

६० वर्षीय वृद्धाचा जळगावच्या मेहरूण तलावात बुड़ुन मृत्यू

81

जळगाव:{आनंद पाटिल}
शहरातील मेहरूण तलावात आज सकाळी ७ वाजेच्या सुमारास एका ६० वर्षीय इसमाचा मृत्यू झाल्याची घटना घडली. बबन नामदेव पवार (वय-६३) रा. जूनी वसाहत, जगवानी नगर, जळगाव असे मृत इसमाचे नाव आहे.याबाबत एमआयडीसी पोलिसांत अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे.
सूत्रांची दिलेली माहिती अशी कि , बबन पवार हे मुलगा आणि सून यांच्यासोबत राहत होते. बबन पवार हे बुधवारी १ मार्च रोजी सायंकाळी काहीकामानिमित्त बाहेर गेले असल्याने त्यांचा आज २ मार्च रोजी सकाळी ७ वाजेच्या सुमारास मृतदेह आढळून आला . मेहरूण तलाव येथे पोहण्यासाठी गेलेल्या काही वन्यजीव पथकातील काही व्यक्तींना त्यांचा मृतदेह पाण्यात तरंगतांना आढळून आला. राजेश सोनवणे, रविंद्र भोई, अजीब काझी यांनी पट्टीच्या पोहणाऱ्यांच्या मदतीने मृतदेह बाहेर काढला. एमआयडीसी पोलीस ठाण्याचे पोलीस कर्मचारी समाधान टहाकळे आणि विकास सातदिवे यांनी घटनास्थळी धाव घेवून पंचनामा केला. बबन पवार हे पाण्यात बुडून कसे मेले ? याबाबत अद्याप कारण स्पष्ट झालेले नसून त्यांचा मृतदेह जिल्हा शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात पाठविण्यात आला . त्यांच्या खिश्यातील कागदपत्रांवरून ओळख पटली. मुलगा विकास पवार यांनी ओळख पटविली. एमआयडीसी पोलीस स्टेशनला अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे. पुढील तपास पोलीस कर्मचारी समाधान टाहकळे करीत आहे.