Home यवतमाळ चहांद येथे शॉट सर्किटने आग लागून तूर व कपाशी जळून शेतकऱ्याचे नुकसान

चहांद येथे शॉट सर्किटने आग लागून तूर व कपाशी जळून शेतकऱ्याचे नुकसान

62

वडकी/सतीश दुधे

जिल्यातील राळेगाव तालुका अंतर्गत येत असलेल्या चहांद येथे शॉट सर्किट होऊन लागलेल्या आगीत लाखो रुपयाचा कापूस व दोन पोते तुरी जळून नुकसान झाल्याचे शेतकरी यांनी सांगितले.

सविस्तर असे की दिनांक 24/2/2023 रोजी चहांद येथील शेतकरी रमेशराव जवादे यांच्या घरी पन्नास क्किंटल कापसाची गंजी लावलेली होती व दहा पोते तुरी होत्या अचानक शॉट सर्किट झाल्याने दहा क्किंटल कापूस व दोन पोते तुरी जळून खाक झाल्या.

या घटनेची माहिती गावकऱ्यांना होताच घटना स्थळाकडे धाव घेत गावकऱ्यांनी आगीवर नियंत्रण मिळविले असून कापूस व तूर जळल्याने मात्र शेतकऱ्याचे फार मोठे नुकसान झाले आहे. या घटनेमुळे सर्वत्र हळहळ व्यक्त केली जात आहे. तरी या घटनेचा तपास करून शासनाने शेतकऱ्याला योग्य ती मदत करावी अशी गावाकऱ्यांकडून मागणी होत आहे.