Home महाराष्ट्र “पत्रकार संरक्षण समिती”ची सिंधुदुर्ग जिल्हा कार्यकारिणी जाहीर;अध्यक्षपदी श्री. प्रसाद मडगांवकर तर सचिवपदी...

“पत्रकार संरक्षण समिती”ची सिंधुदुर्ग जिल्हा कार्यकारिणी जाहीर;अध्यक्षपदी श्री. प्रसाद मडगांवकर तर सचिवपदी श्री. शैलेश मयेकर यांच्यासह विविध पदाधिकारी जाहीर

162

🔸संपूर्ण महाराष्ट्र राज्यात नावलौकिक असलेल्या “पत्रकार संरक्षण समिती (महाराष्ट्र)” ची सिंधुदुर्ग जिल्हा कार्यकारिणी आज जाहीर करण्यात आली असून, समितीचे संस्थापक अध्यक्ष श्री. विनोद पत्रे यांनी नियुक्तीपत्र प्रदान करत श्री. प्रसाद भास्कर मडगांवकर यांची जिल्हाध्यक्षपदी, तर सचिवपदी श्री. शैलेश सुदाम मयेकर यांची नियुक्ती केली. जिल्हा खजिनदारपदी श्री. वासुदेव उर्फ नयनेश गावडे यांची निवड करण्यात आली.
🔹याबरोबरच सिंधुदुर्ग जिल्हा संघटक म्हणून श्री. जाफर शेख यांची निवड करण्यात आली, तर उपजिल्हाjअध्यक्षपदी श्री. संजय सखाराम पिळणकर यांची निवड करण्यात आली. सहसचिवपदी श्री. यशवंत कृष्णा माधव यांची निवड करण्यात आली. तसेच सह खजिनदार पदी श्री. मदन शंकर मुरकर यांची निवड करण्यात आली.
🔸महाराष्ट्राच्या ३० जिल्ह्यांमध्ये कार्यरत असलेल्या, व ग्रामीण तसेच शहरी पत्रकारांच्या व त्यांच्या कुटुंबियांच्या समस्यांना संपूर्ण न्याय देणाऱ्या पत्रकार संरक्षण समितीचे संस्थापक अध्यक्ष श्री. विनोद पत्रे यांनी दूरध्वनीवरून नवनियुक्त पदाधिकाऱ्यांचे अभिनंदन करत, पत्रकार संरक्षण समिती सिंधुदुर्गच्या सर्व सभासद पदाधिकाऱ्यांच्या पुढील यशस्वी वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या.