Home बुलडाणा देऊळगाव राजा तालुक्यातील सुलतानपूर येथील गुन्हातील आरोपी साक्षीदार व नागरीकावर दहशत

देऊळगाव राजा तालुक्यातील सुलतानपूर येथील गुन्हातील आरोपी साक्षीदार व नागरीकावर दहशत

50

भिती निर्माण करीत असल्याने साक्षीदारांना संरक्षण मिळण्याची गावकऱ्यांची मागणी

प्रतिनिधी:-( रवि आण्णा जाधव)

देऊळगाव मही:- हकीकतअशाप्रकारे की दिनांक 5/12/2022 रोजी गावातील रंगनाथ पुंजाजी डोईफोडे त्याचे कुटुंब यांनी तेजराव गोविंदराव डोईफोडे, रावसाहे तेजराव डोईफोडे यांना मारहान करून गंभीर जखमी केले व तेजराव गोविंदराव डोईफोडे यांच्याआंगावर चारचाकी वाहन घालून त्यांना जिवे मारले. सदर प्रकार घडत असतांना गावातील नागरीक व लहान मुले व स्त्रीया यांनी सदर घृणास्पद खुन पाहीला असल्याने लहान मुले व स्त्रिया अजूनही दहशतीखाली जगत आहे. आम्ही ग्रामस्थ सदर घटनेचे प्रत्यक्ष दर्शी साक्षीदार असल्या नागरीकांचे कर्तव्य म्हणून घडलेल्या गुन्ह्याची माहिती पोलिसांना देणे या कर्तव्याची जान ठेउन आम्ही पोलिसांना सदर बाबत साक्षीदार असल्याने आमचे जाबजबाब दिले आहे.
सदर आरोपी व त्याचे नातेवाईक हे गावातील सदर गुन्हातील साक्षीदार यांनी उलट पुरावा देण्याकरिता त्यांच्यावर दबाव निर्माण करीत आहे. परंतु सदर गुन्हा हा माणुसकीला काळीमा फासणारा गुन्हा असल्याने अशा समाजात वर भावना वाढूनये व भविष्यात अनुचित प्रकार घडू नये या साठी समस्यांनी आरोपी त्यांचे नातेवाईक अमिशाल निर्भिडपणे सरकारी साक्ष देण्याची तयारी दर्शविलीआहे.
सरकारी साक्षीदर यांचे कुटुंबावर व नागरीकांवर कोणत्याही वेळी जीवघेणा हल्ला होण्याची शक्यता नाकरता येत नाही त्यामुळे मुले शाळेत जाण्यास सुध्या घाबरत आहे. तसेच यातील आरोपी हे खोट्या स्वरूपाच्या गंभीर गुन्ह्यात पोस्टे येथे आडकवण्याच्या धमक्या देत आहेत. त्यामुळे सदर गुन्यातील साक्षीदार व गावकरी यांना आरोपी व त्यांचे नातेवाईकांपासून जीविताचे व मालमत्तेथे भय निर्माण झाले आहे. व नागरीकांना अपमानीत वाटत आहे. तरी सदर गुन्ह्याचा तपास पूर्ण होईपावेतो सरकारी साक्षीदार व गावकरी बांधवरील आरोपी यांचे दहशतीपासून संरक्षण होवून मिळने करौता गावात पोलिस बंदोबस्त गार्ड नेमण्यात यावे.

*आणि कायदेशीर कारवाई होवून नागरीकांना सरक्षण मिळावे अशा आशयाचे तक्रार पोलीस स्टेशन देऊळगाव राजा येथे मौजे सुलतानपूर येथील गावकऱ्याकडून देण्यात आले आहे.*