Home मराठवाडा जिल्हा परिषदेत आढळले 25 ‘लेटलतीफ’ – सीईओ वर्षा मीना यांची जिल्हा परिषदेत...

जिल्हा परिषदेत आढळले 25 ‘लेटलतीफ’ – सीईओ वर्षा मीना यांची जिल्हा परिषदेत अचानक तपासणी

64
0

जालना -लक्ष्मण बिलोरे

जालना जिल्हा परिषद अंतर्गत उशिरा येणार्‍या अधिकारी /कर्मचारी यांना जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी वर्षा मीना यांनी आज उशिरा येणार्‍या कर्मचारी यांची अचानक जिल्हा परिषदेत तपासणी केली असता २५ कर्मचारी उशिरा आलेले आढळून आले.
कडक शिस्तीच्या अधिकारी अशी ओळख असलेल्या जालना जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी वर्षा मीना यांनी जालना येथील पदभार घेतल्या नंतर जिल्हा परिषद आणि पंचायत समिती अंतर्गत कार्यरत असलेल्या अधिकारी आणि कर्मचारी यांनी वेळेत कार्यालयात यावे या साठी आज अचानक तपासणी मोहीम हाती घेतली असता २५ कर्मचारी उशिरा आलेले आढळून आले.
सर्व सामान्य जनतेची कामे तातडीने मार्गी लावण्यासाठी वर्षा मीना यांनी पाऊल उचलले असून त्याचाच एक भाग म्हणून कार्यालयीन वेळेत हजर न होणाऱ्या कर्मचाऱ्यांनी वेळेत कार्यालयात उपस्थित राहावे या उद्देशाने मुख्य कार्यकारी अधिकारी वर्षा मीना यांनी आज सोमवारी सकाळी कार्यालयात दाखल झाल्यानंतर जिल्हा परिषद कार्यालयाच्या इमारतीत प्रवेश करण्यासाठी असलेले सर्व द्वार १०.३० वाजता बंद करण्याचे आदेश देऊन केवळ त्यांच्या दालनाकडून असलेले द्वार उघडे ठेवत स्वतः वर्षा मीना यांनी दालना बाहेर खुर्चीवर अर्धा तास येणाऱ्या लेट लतिफ कर्मचाऱ्यांना सक्त ताकीद दिली. आजच्या या कार्यवाहीत २५ कर्मचारी उशिरा येण्यामध्ये आढळून आले. यात यांत्रिकि विभाग १, बांधकाम -२,सिंचन -२, वित्त -१, पंचायत -१, महिला व बाल कल्याण -३, एसबीएम-१, कृषि -२, पशूसंवर्धन-२, शिक्षण -४, आरोग्य -१, पाणी पुरवठा -२, आपले सरकार -२, समाज कल्याण -१ कर्मचारी यांचा समावेश असून अचानक झालेल्या या कार्यवाही मुळे जिल्हा परिषद परिसरात खळबळ उडाली आहे.
*चौकट*
आगामी कालावधी मध्ये अशाच प्रकारे अचानक तपासणी करून उशिरा येणार्‍या अधिकारी /कर्मचारी यांच्यावर कार्यालयीन कार्यवाही केली जाईल.
*वर्षा मीना*
मुख्य कार्यकारी अधिकारी
जिल्हा परिषद,जालना

Previous articleघाटंजी येथे जुगार अड्डयावर धाड; 1 लाख 16 हजार 565 रुपये रोख व इतर मालमत्ता जप्त..!
Next articleचिखलवर्धा सरपंच वर्षा कणाके हिच्या अपात्रतेला अमरावती अपर आयुक्ताची स्थगिती..!
भारत सरकारने फेब्रुवारी 2021 पासून अधिसूचित केलेल्या नव्या माहिती तंत्रज्ञान (मध्यस्थ मार्गदर्शक सूचना आणि डिजिटल माध्यमांसाठीची आचार संहिता) नियम 2021 अंतर्गत असलेल्या डिजिटल माध्यमांसाठीच्या आचार संहितेचे आम्ही पालन करतो. तरीही एखाद्या बातमीविषयी आपली तक्रार असल्यास आमच्या वेब माध्यमचे तक्रार निवारण अधिकारी आणि स्वनियमन संस्थेकडे विहित नमुन्यात अर्ज करू शकता. आपल्या तक्रारीचे निराकरण केले जाईल.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here