मराठवाडा

गुलमंडी परिसरात कोरीयरच्या मँनेजरची दिवसाढवळ्या भोसकून हत्या…

Advertisements

अब्दुल कय्युम

हवालाच्या व्यवहाराचा संशय

औरंगाबाद , दि. ०१ :- ३१ जानेवारी- हवालाच्या व्यवहारातून झालेल्या वादातून तीन ते चार जणांनी धारदार शस्त्राने भोसकून कोरीयर कंपनीच्या मँनेजरची निर्घुणपणे हत्या केल्याने शहरात खळबळ उडाली आहे. ही घटना शुक्रवारी दुपारी १२.३० वाजेच्या दरम्यान गुलमंडी परिसरातील नगरखाना गल्लीत घडली. प्रकाश जसवंतभाई पटेल उर्फ कमलेशभाई, वय ३४, रा.गुजरात, सध्याचे मुक्काम नगारखाना गल्ली, गुलमंडी परिसर असे मयत कोरीयर कंपनीच्या मँनेजरचे नाव आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, दिवाण देवडीच्या बाजुला असलेल्या नगारखाना गल्लीत मोहन कोरीयर कंपनीत प्रकाश पटेल हे मँनेजर म्हणून काम करत होते. नगारखाना गल्लीतील ऑफिसवर ते नेहमी बसत होते. कामानिमित्ताने हे नेहमी गुजरात यथे जात असत. शुक्रवारी सकाळीच प्रकाश पटेल हे गुजरातहून शहरात आले होते. सकाळी ऑफीस उघडल्यावर काही वेळ ते ऑफिसचे काम करत बसले होते. दुपारी साडे बारा वाजेच्या सुमारास त्यांच्या ऑफिसमध्ये तोंडाला रूमाल बांधलेले तीन जण घुसले. प्रकाश पटेल यांना काही कळण्याच्या आताच त्यांच्यावर धारदार शस्त्राने सपासप करण्यात आले. छातीवर व पोटावर वार करून आरोपी ऑफिसमधून फरार झाले. गंभीर जखमी अवस्थेत असलेल्या प्रकाश पटेल यांनी ऑफीस जवळच राहत असलेल्या नातेवाईकाच्या घराकडे धाव घेतली. त्या ठिकाणी ते रक्ताच्या थारोळ्यात खाली कोसळले. त्यांना नातेवाईकांनी उपचारासाठी घाटी रूग्णालयात दाखल केले असता डॉक्टरांनी तपासून मयत घोषीत केले. या घटनेची माहिती मिळताच सिटीचौक पोलिस ठाण्याचे निरीक्षक संभाजी पवार व गुन्हे शाखेच्या पथकाने घटनास्थळी धाव घेतली. सदरील पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे. पुढील तपास पोलीस करत आहे.

You may also like

राष्ट्रवादी काँग्रेसचे खंदे समर्थक बालकिशन लोया यांचे निधन

घनसावंगी – लक्ष्मण बिलोरे जालना जिल्ह्याच्या घनसावंगी तालुक्यातील कुंभार पिंपळगाव येथील रहिवासी,तथा राजकीय क्षेत्रातील राष्ट्रवादी ...
मराठवाडा

अतिवृष्टीमुळे शेतकऱ्यांच्या पिकांच्या नुकसानाची पाहणी करुन तात्काळ पंचनामे करा – युवा सेनेचे तहसीलदारांना निवेदन

घनसावंगी – लक्ष्मण बिलोरे जालना – मागील पंधरवड्यात तालुक्यात पडत असलेल्या सततच्या पावसामुळे घनसावंगी तालुक्यातील ...