Home मुंबई शिक्षकांना जनगणनेच्या कामातून वगळावे – आमदार कपिल पाटील

शिक्षकांना जनगणनेच्या कामातून वगळावे – आमदार कपिल पाटील

235

लियाकत शाह

मुंबई , दि. ३० :- शिक्षकांना जनगणनेच्या कामातून वगळावे या मागणीसाठी आमदार कपिल पाटील यांनी नागरिक नोंदणी जनगणना ऑपरेशन्सच्या महाराष्ट्र संचालक श्रीमती रश्मी झगडे यांची भेट घेतली. जनगणनेत शिक्षकांना शेवटचा पर्याय म्हणूनच काम दिलं जाईल असं श्रीमती रश्मी झगडे यांनी सांगितलं. जनगणनेचं काम करणाऱ्या कर्मचारी आणि शिक्षकांना ४५ दिवसांची अर्जित रजा देण्याची मागणीही त्यांनी मान्य केली. तशी शिफारस करण्याचं आश्वासन त्यांनी दिले. मागच्या जनगणनेच्या वेळेला आमदार कपिल पाटील यांच्या पाठपुराव्यानंतर राष्ट्रीय जनगणना संचालनालयाने ४५ दिवसांची विशेष अर्जित रजा मंजूर केली होती. त्याची आठवण यावेळी दिल्यानंतर श्रीमती झगडे यांनी ती मागणी मान्य केली. गरोदर महिला तसेच आजारपण, व्याधी, अपंगत्व असलेले व निवृत्तीकडे झुकलेले शिक्षक यांना वगळण्यात येईल असेही त्यांनी सांगितले. परीक्षा, पेपर तपासणी आणि ट्रेनिंग मध्ये असलेल्या शिक्षकांनाही वगळण्याबाबत आपण उचित शिफारस करू असे आश्वासन त्यांनी दिले.