Home बुलडाणा घरच्यांच्या विरुद्ध प्रेम विवाह केल्याने विवाहितेचा छळ व मारहाण

घरच्यांच्या विरुद्ध प्रेम विवाह केल्याने विवाहितेचा छळ व मारहाण

250

 

पती सासू सासऱ्या सह गुन्हे दाखल…!

प्रतिनिधी 🙁 रवि आण्णा जाधव

)देऊळगाव राजा : – सासू सासरे नणंद यांच्या विरुद्ध पतीने विवाहिते सोबत प्रेम विवाह केला . त्यामुळे पती सह सासरच्यांनी विवाहितेला मानसिक त्रास व माहेरवरून पाच लाख रुपये घेवून ये यासाठी कौटुंबिक छळ करुण मारहाण केली अशा महिलेच्या तक्रारी वरुण अंढेरा पोलिसांनी २२ जुलै रोजी पाच आरोपी विरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला . ही घटना गांगलगाव येथे घडली .

अंढेरा पोलीस स्टेशन अंतर्गत येणाऱ्या गांगलगाव येथील रहिवासी असलेल्या सौ.कोमल खुशाल वारुडे वय २१ वर्ष या विवाहितेने दिलेल्या तक्रारी मध्ये म्हटले की ,माझा प्रेम विवाह देवपुर जिल्हा धुळे येथील खुशाल दिलीप वारुडे वय ३१ वर्ष.यांच्या सोबत झाला होता .मात्र हा प्रेम विवाह पतीच्या आई वडील व नणंद यांच्या विरुद्ध केल्यामुळे सासरच्या मंडळींनी जाणूनबुजून त्रास देण्याचा उद्देशाने विवाहितेस म्हटले की तू आमच्या मुलाला प्रेम प्रकरणात फसवून लग्न केले , लग्ना मध्ये कमी हुंडा दिला म्हणून तुझ्या वडिलांकडून पाच लाख रूपये घेवून ये असे म्हणून तिला मानसीकछळ त्रास देवुन तिचा कौटुंबीक छळ करीत चापटबुक्याने मारहाण केली तसेच जिवे मारण्याची धमकी दिली.अशा विवाहितेच्या तक्रारी वरुण ठाणेदार गणेश हिवरकर यांच्या मार्गदर्शनाखाली बिट अमलदार पोफळे , सिरसाट यांनी आरोपी पती खुशाल दिलीप वारुडे वय ३१ वर्ष ,सासरे दिलीप धुडकु वारुडे ६० वर्ष , सासू सौ मनिषा दिलीप वारुडे ५१वर्ष , नणंद सौ सिमा अरविंद बोरसे ३६ वय वर्ष , सौ लतीका दिपक साळुंके वय ३३ वर्ष सर्व देवपुर जिल्हा धुळे यांच्या विरुद्ध अप न २३७/२२ कलम ४९८ , ( अ ) , ३२३, ५०४, ५०६ , ३४ भादवी नुसार गुन्हे दाखल करण्यात आले आहेत .