Home यवतमाळ घाटंजी तालुक्यातील कुर्ली येथील ग्रामीण बॅकेचे रोखपाल यांचा जामीन अर्ज घाटंजी न्यायालयाने...

घाटंजी तालुक्यातील कुर्ली येथील ग्रामीण बॅकेचे रोखपाल यांचा जामीन अर्ज घाटंजी न्यायालयाने फेटाळला..!

191

 

(अयनुद्दीन सोलंकी)
घाटंजी : घाटंजी तालुक्यातील कुर्ली येथील विदर्भ कोकण ग्रामीण बॅकेचे रोखपाल गणपत रामेश्वर आसुटकर यांचा जामीन अर्ज घाटंजी येथील दिवाणी व फौजदारी न्यायाधिश तथा प्रथम वर्ग न्यायदंडाधिकारी ए. ए. कळमकर यांनी फेटाळला असुन आरोपीला मंगळवार पर्यंत पोलीस कोठडी सुनावली आहे. सरकारी पक्षाची बाजू सहाय्यक सरकारी वकील अँड. प्रिती इंगळे यांनी मांडली. सदर प्रकरणाचा तपास पारवा पोलीस स्टेशनचे ठाणेदार तथा सहाय्यक पोलीस निरीक्षक विनोद चव्हाण हे करित आहे.

घाटंजी तालुक्यातील कुर्ली येथील विदर्भ कोकण ग्रामीण बॅकेत फिर्यादी गिरजा श्रीकृष्ण आडे (रा. रोयपेंड) यांनी सन २०२० मध्ये बचत खाते उघडले होते. सदर खात्यात शेतातील पिकाची रक्कम खातेदार वेळोवेळी टाकत होती. १४ मे २०२० रोजी फिर्यादी गिरजा आडे हिने ४९ हजार ९९९ रुपये बॅकेत जमा केले व १६ जुलै २०२० रोजी ५० हजार रुपये जमा केले होते. फिर्यादीच्या मुलीचे लग्न असल्याने तिने रक्कम विड्राल करण्यासाठी ३ जानेवारी २०२२ रोजी बॅकेत गेली. बॅकेत विड्राल दाखल केल्यानंतर बॅकेत नव्याने रुजु झालेले रोखपाल राजु राजुरकर यांनी फिर्यादीचे खाते तपासले असता बचत खात्यात ५० हजार रुपये कमी असल्याचे आढळले. बॅकेत रक्कम जमा करते वेळेस तेव्हा रोखपाल म्हणुन गणपत रामेश्वर आसुटकर हे कार्यरत होते. तसेच कुर्ली येथील पांडुरंग मडावी यांचे सुद्धा ५० हजार रुपये बॅकेत जमा करण्यात आले नाही. त्यामुळे दोघांचीही फसवणुक झाल्याची लेखी तक्रार पारवा पोलीस ठाण्यात दाखल केली. सदरच्या लेखी तक्रारीवरुन ठाणेदार विनोद चव्हाण यांनी आरोपी गणपत आसुटकर विरुद्ध अपहार केल्याचा गुन्हा दाखल करुन तपास सुरू केला.

सुरवातीला आरोपी विदर्भ कोकण ग्रामीण बॅकेचे रोखपाल गणपत आसुटकर यांनी यवतमाळचे जिल्हा न्यायाधीश १ तथा अतिरिक्त जिल्हा व सत्र न्यायाधीश जी. जी. भंसाळी यांच्या न्यायालयात अटकपूर्व जामीन अर्ज दाखल केला. मात्र, न्यायालयाने तो अटकपूर्व जामीन अर्ज फेटाळून लावला. त्यानंतर आरोपी गणपत आसुटकर यांनी मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठात अटकपूर्व जामीनासाठी अर्ज दाखल केला. मात्र, तेथे सुद्धा मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठाचे न्यायमूर्ती अनिल एस. किलोर यांनी आरोपी गणपत आसुटकर यांचा अटकपूर्व जामीन अर्ज फेटाळून लावला होता. आरोपी अनेक दिवस फरार होता. अखेर पारवा पोलीसांनी त्याला अटक करुन त्याची मंगळवार पर्यंत पोलीस कोठडी मिळवली आहे. दरम्यान, केळापूर तालुक्यातील रुंझा येथील विदर्भ कोकण ग्रामीण बॅकेत सुद्धा आरोपी गणपत आसुटकर यांनी अशाच प्रकारे घोटाळा केल्याचे खात्रीलायक वृत्त आहे. पुढील तपास ठाणेदार विनोद चव्हाण हे करित आहे.