Home बुलडाणा देऊळगाव मही येथे राजमाता पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांच्या जयंती निमित्ताने राधाताई भोलाने...

देऊळगाव मही येथे राजमाता पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांच्या जयंती निमित्ताने राधाताई भोलाने पाटील यांच्या कीर्तनाचे आयोजन , “नाचू कीर्तनाच्या रंगी ज्ञानदीप लाऊ जगी राधताई पाटील”

307

 

प्रतिनिधी:-(रवि अण्णा जाधव )
देऊळगाव मही:-गेल्या दोन वर्षापासून कोरणामुळे जयंती उत्साह साजरा झाला नाही परंतु आज संपूर्ण देशात कोरोणाचा सावट कमी होत असून आहे राजमाता पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांची जयंती मोठ्या उत्साहात साजरी होणार असून 30 मे रोजी राजमाता पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांची 297 वी जयंती निमित्ताने महाराष्ट्रातील प्रसिद्ध महिला कीर्तनकार ह भ प राधाताई बोलाने पाटील यांच्या कीर्तनाचा कार्यक्रम देऊळगाव मही येथे आयोजित करण्यात आला आहे
संपूर्ण मे महिना हा पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकरांच्या कार्यकर्तुत्व,नेतृत्व, दातृत्वाचा जागर करण्यासाठीआहे,
पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांनी अखंड मानवजातीसह पशुपक्षी,जलचर-जीवजंतू यांच्या अन्नपाण्याची व्यवस्था करुन लोककल्याणकारी आदर्श असा राज्यकारभारासह समतेचे,ममतेचे राज्य निर्माण करुन भारतातील धार्मिक सांस्कृतिक, आर्थिक, व्यावसायिक स्तर उंचावला अशा या पुण्यश्लोक अहिल्यादेवींची जयंतीच्या माध्यमातून ह भ प राधाताई पाटील यांच्या माध्यमातून प्रकाश टाकला जाणार आहे तरी या कार्यक्रमाला जास्तीत जास्त संख्येने उपस्थित राहावे असे आवाहन जय मल्हार मित्र मंडळाच्या वतीने करण्यात आले आहे