Home बुलडाणा प्रवाशांना बसण्याची सोय करा अन्यथा महाराष्ट्र दिनी उपोषणाचा इशारा

प्रवाशांना बसण्याची सोय करा अन्यथा महाराष्ट्र दिनी उपोषणाचा इशारा

362

 

भाजपा शहराध्यक्ष राऊत यांच निवेदन

प्रतिनिधी:-( रवि आण्णा जाधव )
 देऊळगाव मही : राजकीय दृष्ट्या तालुक्यातील महत्वपूर्ण गाव असलेल्या देऊळगाव मही बसस्थानकाचा प्रश्न गत अनेक वर्षापासून प्रलंबित असून भाजपाचे शहराध्यक्ष कैलास राऊत यांनी पालकमंत्री डॉ राजेंद्र शिंगणे यांच्याकडे देऊळगाव मही ला बस स्थानक बांधून द्या अशी मागणी एका निवेदनाद्वारे केली मात्र बस स्थानकाचा प्रश्न अद्यापही प्रलंबित असून देऊळगाव मही येथे प्रवाशांना बसण्याची सुविधा उपलब्ध करून देण्यात येईल अन्यथा महाराष्ट्र दिनापासून उपोषण करण्याचा इशारा कैलास राऊत त्यांनी सरपंच सचिव यांना एका निवेदनाद्वारे दिला आहे

देऊळगाव मही येथील कैलास राऊत यांनी निवेदन देऊन अनेक वर्षापासून प्रलंबित असलेल्या बसस्थानका संदर्भात चर्चा केली देऊळगाव मही ही मोठी बाजारपेठ आहे आणि सुमारे १०० खेडे गावांचा संपर्क या बाजारपेठेशी असल्यामुळे महीला व पुरुष खरेदीसाठी येतात या जनतेच्या महत्वपूर्ण अशा बस स्थानका साठी जागा आरक्षणाचा प्रश्न सोडवला नाही मागील पंचवर्षीकेत पाच सरपंचानी पदे भूषविली या कालावधीत ग्रामपंचायत च्या मालकीच्या जमिमीवर अतिक्रमण झाले मात्र बस स्थानकासाठी जागा आरक्षित एक ही सरपंचाला करता आली नाही आजपर्यंत ग्रामपंचायतने या दृष्टीने उपाय योजना केल्या नाही परिणामी राष्ट्रीय महामार्ग लगत असलेल्या ग्रामपंचायतीच्या मालकीच्या जमिनी भूखंड माफियांच्या घशात गेल्या आहेत राष्ट्रीय महामार्गाचे निर्मिती झाल्यानंतर राष्ट्रीय महामार्गाला लागून असलेले सर्व ठिकाणी प्रवाशांना बसण्याची सोय आहे हे मात्र देऊळगाव मही हेच अपवाद आहे या ठिकाणी आणि प्रवाशांना बसण्यासाठी कुठलीच सुविधा नाही रखरखत्या उन्हात प्रवाशांना उभे राहावे लागत आहे मुळे देऊळगाव मही येत ते तात्काळ प्रवाशांना बसण्याची ची सुविधा उपलब्ध करून देण्याची मागणी कैलास राऊत यांनी केली 
सदर निवेदनावर श्रीकृष्ण शंकरराव शिंगणे ,शेख कलीम , सचिन वसंतराव पाटील ,संतोष प्रेमदास शिंगणे राजेंद्र शिंगणे, मोहम्मद पयाज आदींच्या सह्या आहेत  , सर्वांना माहीत आहे मी जवळपास पाच वर्षापासून बस स्थानक साठी सर्वच लोकांकडे मागणी मांडत आहे .

जोपर्यंत देऊळगाव माहित बसस्थानक होणार नाही तोपर्यंत माझा लढा चालूच होता व चालूच राहील मला खात्री आहे पालकमंत्री राजेंद्र शिंगणे यांनी दिलेले आश्वासन ते पूर्ण करतील या व लवकरच येथे बसस्थानक होईल बस स्थानक न झाल्यास माझा लढा थांबणार नाही. तो अधीक तीव्र होईल -कैलास राऊत शहराध्यक्ष भाजप दे.मही