Home यवतमाळ महाराष्ट्र दिना निमित्य यवतमाळ जिल्हा शिवसेनेतर्फे महारक्तदान शिबिर

महाराष्ट्र दिना निमित्य यवतमाळ जिल्हा शिवसेनेतर्फे महारक्तदान शिबिर

290

यवतमाळ – महाराष्ट्र दिन व कामगार दिनाचे औचित्य साधून यवतमाळ जिल्हा शिवसेनेतर्फे महारक्तदान शिबिराचे आयोजन कै. वसंतराव नाईक शासकीय वैद्यकीय महाविद्यालय यवतमाळच्या रक्तपेढी येथे करण्यात आले आहे.यवतमाळ जिल्हा शिवसेनेतर्फे हा उपक्रम दर वर्षी आयोजित केल्या जातो.ह्या रक्तदान शिबिराचे उदघाटन 1 मे महाराष्ट्र दिनाला यवतमाळ जिल्ह्याचे पालकमंत्री नामदार संदीपानजी भुमरे व माजी मंत्री आमदार संजय राठोड यांचे प्रमुख उपस्थितीत सकाळी 10 वाजता होणार आहे.

उन्हाळ्याचे दिवसात उन्हामुळे शासकीय शासकीय वैद्यकीय महाविद्याया मध्ये रक्ताची कमतरता भासते व नेमके ह्या काळात रक्तपेढी मध्ये रक्त उपलब्ध नसते.सिकलसेल,अपघात रुग्ण,शस्त्रक्रिया करावी वागणारे रुग्ण ह्यांना ह्या टंचाई मुळे रक्ताची कमतरता भासते.नेमकी हीच गरज लक्षात घेऊन माजी मंत्री संजय राठोड यवतमाळ जिल्हयाचे जिल्हा प्रमुख असताना त्यांनी हा उपक्रम दर वर्षी आयोजित करणे सुरू केला व तो आजतागत सुरू आहे.ह्या उपक्रमात शिवसेनेचे लोकप्रतिनिधी,जिल्हा प्रमुख,जिल्हा संघटक,उपजिल्हा प्रमुख,तालुका प्रमुख,शहर प्रमुख,शाखा प्रमुख,महिला आघाडी,युवासेना व शिवसेना प्रणित संघटनांचे सर्व पदाधिकारी मोठ्या संख्येने रक्तदान करणार आहेत.रक्तदान करणाऱ्याला जिल्हा शिवसेना व आमदार संजय राठोड यांचे तर्फे आकर्षक भेटवस्तू देण्यात येईल.

मुंबई सह संयुक्त महाराष्ट्र मिळवण्यासाठी आपल्या प्राणांची आहुती देणाऱ्या 106 हुताम्यांना आदरांजली देण्यासाठी आयोजित ह्या रक्तदान शिबिराला नागरिकांनी देखील जास्तीत जास्त संख्येने उपस्थित राहावे व रक्तदान करावे असे आवाहन जिल्हा प्रमुख विश्वास नांदेकर,जिल्हा प्रमुख राजेंद्र गायकवाड व जिल्हा प्रमुख पराग पिंगळे व जिल्हा शिवसेनेतर्फे करण्यात आले आहे.