Home मराठवाडा कुंभार पिंपळगाव येथे डॉ. आंबेडकर यांच्या जयंतीनिमित्त प्रा.सुकुमार कांबळे यांचे व्याख्यान

कुंभार पिंपळगाव येथे डॉ. आंबेडकर यांच्या जयंतीनिमित्त प्रा.सुकुमार कांबळे यांचे व्याख्यान

344

 

घनसावंगी-लक्ष्मण बिलोरे

जालना जिल्ह्याच्या घनसावंगी तालुक्यातील कुंभार पिंपळगाव येथे विश्वरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंती महोत्सवाचे ३० एप्रिल रोजी शनिवारी आयोजन करण्यात आले असून या निमित्त जेष्ठ साहित्यीक‌,प्रा.सुकुमार कांबळे यांचे व्याख्यान होणार आहे. बाबासाहेबांच्या जयंती महोत्सवा निमित्त कार्यक्रमाची रूपरेषा अशी-सकाळी ९ वाजता बौध्दाचार्य राजकुमार खरात यांचे हस्ते ध्वजारोहण दुपारी ३वाजता डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेची मिरवणूक नंतर जाहिर सभा.या कार्यक्रमाचे अध्यक्ष जेष्ठ सामाजिक कार्यकर्ते रामेश्वर लोया तर सुरेश आपूट ,धनंजय कंटूले,शंकर सोनवणे,पांडुरंग कंटूले यांची प्रमुख उपस्थिती राहणार आहे. जयंती महोत्सव समिती पुढील प्रमाणे-अध्यक्ष भिमराव रोहिदास शिंदे,उपाध्यक्ष दिपक परमेश्वर दाभाडे,सचिव विजय भिमराव शिंदे,सहसचिव अक्षय शिंदे,राजेंद्र साळवे,कोषाध्यक्ष शरद शिंदे,सहकोषाध्यक्ष जितेंद्र सदर,कार्याध्यक्ष सिद्धार्थ गाढे,सहकार्याध्यक्ष जनार्दन शिंदे,संदीप दाभाडे तर स्वगताध्यक्ष मनोज गाढे यांचे नियोजन असणार आहे. कार्यरक्रमास मोठ्या संख्येने उपस्थित राहावे असे आवाहन आयोजकांनी केले आहे.