Home बुलडाणा भव्य गुरुपूजन आनंद सोहळा धोत्रा नंदईत आनंदमय वातावर.…..हा सुख सोहळा स्वोर्गी नाही

भव्य गुरुपूजन आनंद सोहळा धोत्रा नंदईत आनंदमय वातावर.…..हा सुख सोहळा स्वोर्गी नाही

296

 

संत येती घरा तोचि दिवाळी दसरा

प्रतिनिधी:-( रवि आण्णा जाधव )

देऊळगाव राजा:-तालुक्यातील धोत्रा नंदाई या गावात एकेकाळी शाळेचे मुख्याध्यापक असणारे गुरुवर्य ह.भ.प.त्र्यंबकबोवा सानप उर्फ नाना यांना दक्षिणा देऊन गुरुपूजन सोहळा पडव्याचे मुहुर्तावर उत्सहात साजरा केला.गुरुजी १९८३ ते १९९७ पर्यंत शिक्षक होते.गुरुजी शाळेत रुजू झाले तेव्हा शैक्षणिक दुरावस्था होती. एका खोलीमध्ये दोन शिक्षक शिकवत होते गुरुजींनी गावात शैक्षणिक वातावरण निर्माण केले व जोमाने कमला लागले.ग्रामस्थांच्या व शासनाच्या मदतीने एका खोलीच्या आठ खोल्या बांधल्या चौथी पर्यंतची शाळा सातवीपर्यंत वर्ग वाढविले.५५ पटसंख्येची शाळा ३५० पोटापर्यंत नेली ८ शिक्षक कार्यरत होते शाळेच्या भोवतीची ई क्लास अतिक्रमीत जमीन गावकऱ्यांचे सहकार्याने सोडवून ०४ एकर जमीन शाळेसाठी मिळवली.गुरुजी वारकरी असल्यामुळे गावात वारकरी संप्रदाय वाढविला.शाळेच्या जमिनीवर विविध प्रकारची झाडे व फुलझाडे लावुन शाळेचे वातावरण चांगले बनविले. गुरुजींचे विद्यार्थी आज वैद्यकीय अभियांत्रिकी, शैक्षणिक व सैन्य दलात सेवारत आहेत.गुरुजी १९९७ साली मुख्यध्यापक पदावरून सेवानिवृत्त झाले.तरी गावचे प्रेम अद्याप कायम आहे.सेवानिवृत्ती नंतर गुरुजींच्या प्रेमी मंडळींनी एक धार्मिक संस्था ट्रस्ट केली.सदर संस्थेच्या जमिनीवर गुरुजींनी मार्बलमध्ये दोन कोटीचे हेमाडपंथी मंदिर बांधले.त्यात विठ्ठल-रुक्मिणीच्या मूर्तीची स्थापना केली.सांप्रत ७५ लाखांचे महाद्वाराचे काम मार्बलमध्ये सुरु आहे. हा सर्व पैसा लोकवर्गणीतून तयार झाला आहे. पैशाची अडचण जाणून धोत्रा नंदाई वासीयांनी गुरुजींना गावात नेऊन,मिरवणूक काढली.गुरुपूजन करून ५,६३,५०० रुपयाची गुरुदक्षिणा अर्पण केली.ती गुरुदक्षिणा गुरुजींनी संकल्प सोडून संस्थेच्या सचिवांकडे सुपूर्द केली.सदर सोहळ्यासाठी गुरुजींची सर्व प्रेमी मंडळी आली होतो.प्रामुख्याने डॉ रामप्रसादजी शेळके,श्री शंकराव उगलमुगले सर,श्री समाधान शिंगणे,माजी जि.प.सदस्य श्री भगवानराव मुंढे,व त्याचे सर्व सहकारी त्यावेळचे गुरुजींचे सह शिक्षक, वैष्णवगडाचे अध्यक्ष श्री जगन्नाथ जायभाये, उपाध्यक्ष श्री सखाराम बुरकुल,सचिव श्री सुखदेव ताठे व संस्थेचे पदाधिकारी हजर होते.श्री वसंतराव उदावंन ,श्री कैलास सेठ डोडिया, ह.भ.प.रमेश महाराज जायभाये, ह.भ.प.बंडू महाराज चेके, गुरुजींचे व्याही कृषीशास्त्रज्ञ श्री श्रीधरराव घुगे, डॉ महेशराव घुगे तसेच गुरुजींचे नाते वाईक व इतर समाज बहूसंख्येने उपस्थित होते. आभार प्रदर्शन होऊल सर्वाना फराळ देऊन भव्य गुरूपूजन सोहळा हा गोड कार्यक्रम संपन्न झाला.