Home महत्वाची बातमी राष्ट्रिय महामार्गाने कारने प्रवास करणार्‍या कुटुंबाला जबर मारहान करुन लुटले

राष्ट्रिय महामार्गाने कारने प्रवास करणार्‍या कुटुंबाला जबर मारहान करुन लुटले

165

 

तळेगावच्या सत्याग्रहि घाटासमोरील घटना : दागदागीण्यासह रोख १७८३०० रु. ऐवज लंपास.

इकबाल शेख – वर्धा

तळेगाव (शा.पं.) :- तळेगाव पोलीस स्टेशनच्या हद्दितील राष्ट्रिय महामार्ग क्र. ६ वरील तळेगाव नजीकच्या सत्याग्रहि घाटाच्या समोर शेगाव वरुन भंडाराला कारने जात असलेल्या कुटुंबाला कार पंचर करुन कार थांबवुन मारहान करुन लुटमार केल्याची घटना मध्यरात्री घडली.

प्राप्त माहितीनुसार, फिर्यादी उमेश भैयालाल उरकुडे रा. भंडारा रोड, सुभाष वार्ड, वरठी ता. मोहाडी जि. भंडारा हे पत्नि चंदा उरकुडे, मामी अलका हरसे, वहिनी रेवता उरकुडे, भाचा वैभव कुरवे, तसेच कार चालक विशाल नेवारे कुटुंब शेगावाला त्यांच्या नातेवाईकाच्या मय्यती करीता गेले होते. अंत्यविधी आटोपवुन मंगळवारला रात्री शेगावहून भंडारा कडे त्यांच्या कार क्र. MH 36 AG 6631 ने लकुटुंबासह जात असताना मध्य रात्री तिन वाजताच्या सुमारास अमरावती-नागपुर राष्ट्रिय महामार्गावरील सत्याग्रहि घाटाच्या समोर कारचा समोरील टायर फुटल्याचा आवाज आल्याने चालकाने कार रोडच्या बाजुला थांबवून चालक व फिर्यादीचा भाचा वैभव खाली उतरले व स्टेपनी काढण्यासाठी कारची डिक्की उघडन्यासाठी मागे गेले तेव्हा साधारणता 30 ते ३५ वर्ष वयाच चार अज्ञात युवक लाठी घेवून पाठीमागुन आले व त्याने दोघांनाही मारहान सुरु केली फिर्यादीने त्यांना रोखण्याचा प्रयत्न केला असता त्यांनी त्याच्यावर हमला करून दोन्ही हातावर उजव्या पायाच्या टोंगळ्या खाली तसेच पाठीवर लाठीने मारहान करुन जख्मी केले. सोबत असलेल्या महीलांना दागिन्याची मागणी करून शिवीगाळ करुन मारहान सुद्धा केली.व महिलांसह पुरुषांच्या अंगावरील एकुन ५५ ग्रॅम सोने, १८ ग्रॅम चांदी नगदी रोख ११४००/- रु. असा दाग दागीण्यासह नगदी रोख १७८३०० रु. ऐवज लुटुन नेला. सोबत कपड्याच्या बॅगा महत्वाचे डॉक्युमेन्ट, तसेच कारचा चालक विशाल याचे वाहनाचे डॉक्युमेन्ट सुद्धा लंपास केले.
तसेच फिर्यादीचे मयत जावई यांचे वैद्यकीय उपचाराची फाईल सुध्दा घेवुन गेले सोन्याच दागिने जबरीने घेताना त्या ईसमानी कटरचा वापर केला होता, जबरीने चोरी व लुटमारी करण्यासाठी डरोडेखोरांनी हेतुपूर्वक कुठल्यातरी वस्तुचा वापर करून कारचा टायर पंचर करून अडविले असल्याचे फिर्यादिने नमुद केले.

. तसेच या घटनेच्या अंदाजे 15 मिनीटे पूर्वी त्या इसमानी याच परीसरात नागपुर वरुन अमरावती कडे जाणाऱ्या स्विफ्ट डिझायर कार क्र.MH 19BU 2614 वे कार चालक राहुल प्रेमदास तायडे रा. अमरावती याला सुध्दा अशाच प्रकारे मारहान करून जबरीने नगदी 2000/- रु. हिसकावून घेतल्याचे सुद्धा फिर्यादीने नमुद केले आहे.