Home मराठवाडा सत्य,अहिंसा,शांति या गुणांना व्यवहारात आणले तर जातीयवाद, धर्मवाद नष्ट होईल – ब्रह्माकुमारी...

सत्य,अहिंसा,शांति या गुणांना व्यवहारात आणले तर जातीयवाद, धर्मवाद नष्ट होईल – ब्रह्माकुमारी सिमा दिदी

616

 

जालना – लक्ष्मण बिलोरे

तथागत गौतम बौध्द आणि डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे विचार आचरणात आणावेत.सत्य ,अहिंसा,शांति या गुणांना आपल्या व्यवहारात आणले तर जातीवादी, धर्मवाद बंद होतील आणि विश्व एक परिवार हि भावना निर्माण होईल असा विश्वास प्रजापिता ब्रह्माकुमारीज ईश्वरीय विश्व विद्यालयाच्या संचालिका ब्रह्माकुमारी सिमा दिदी यांनी व्यक्त केला.

सातोना खुर्द ,ता.परतुर येथे ३ एप्रिल रोजी बौध्द धम्म परिषदेचे आयोजन करण्यात आले होते.या निमित्ताने ध्वजारोहण,धम्मदेशना दुपारी भोजनदान,वक्त्यांचे भाषण,सायंकाळी भिम गीतांचा जंगी कार्यक्रम घेण्यात आला.या कार्यक्रमाचे उद्घाटन डॉ. भिक्खू खेमधम्मो महाथैरो यांचे हस्ते झाले,कार्यक्रमाचे अध्यक्ष रायुकॉचे जिल्हाध्यक्ष कपिल आकात,लॉगमार्च प्रणेते जोगेंद्र कवाडे,माजी आमदार सुरेशकुमार जेथलिया, उपसरपंच विलासभाऊ आकात,प्रदीपदादा सोळंके,सयद अली,यश ग्रुपचे बालूकाका आकात,जिप सदस्य इंद्रजीत घनवट,डा मिलिंद खरात याप्रसंगी पिआरपी चे राष्ट्रीय कार्याध्यक्ष जयदीप कबाडे,जिल्हाध्यक्ष राजेंद्र हिवाळे,मराठवाडाअध्यक्ष विलास मुंडे ,जितेंद्र मुंडकर यांची प्रमुख पाहूणे म्हणुन उपस्थिती होती.या कार्यक्रमाचे आयोजक मुंजाभाऊ वाव्हळ यांनी उपस्थितांचे आभार व्यक्त केले कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी धिरज वाव्हळ,भगीरथ दवंडे,राहूल वाव्हळ,राम वाव्हळ,वसंत दवडे,रमेश वाव्हळ,योगेश वाव्हळ,सुनील दवंडे,रवि सोनट्के यांनी परिश्रम घेतले.