Home बुलडाणा जिल्हा माहिती अधिकारी माहिती साहाय्यक तायडे यांचा दुटप्पीपणा,

जिल्हा माहिती अधिकारी माहिती साहाय्यक तायडे यांचा दुटप्पीपणा,

348

 

अनेक पत्रकार पास न दिल्यामुळे राज्यपालाच्या दौर्‍या पासून वंचित,

सिंदखेड राजा येथे महामहीम राज्यपालांचा दौरा दि 4 फेब्रुवारी ला आयोजित केला होता सुरुवातीला शासकीय दौरा असल्याने पोलीस विभागाने पत्रकारांना पास देण्याचे नाकारले मात्र रात्री उशिरा पत्रकारांना पास देण्याचे ठरविलं त्यासाठी जिल्हा माहिती अधिकारी यांचे पत्र पोलिस विभागाने घेतले सदर पत्र देताना माहिती सहाय्यक निलेश तायडे यांनी आपल्या मर्जीतील पत्रकारांची यादी दिली त्या यादीमध्ये काही जण पत्रकार नसतानाही त्यांची नावे पत्रकार म्हणून दिली मात्र जे पत्रकार म्हणून काम करतात असे अनेक पत्रकारांचे नावे यादीत दिली नसल्याने अनेक पत्रकारांना या दौऱ्याचे वृत्त संकलन करण्यापासून वंचित राहावे लागले माहिती सहाय्यक असलेले निलेश तायडे यांना तालुक्यात कोण कोण पत्रकार आहेत त्यांची यादी त्यांच्याकडे असणे आवश्यक आहे किंवा नसेल तर संबंधित वर्तमानपत्र च्या जिल्हा कार्यालयातून नावे घेऊन ती नावे पोलीस स्टेशन मध्ये देणे आवश्यक होते मात्र तसे न करता शहरातील जिल्हा माहिती अधिकारी यांनी कुणाकडून मर्जीतील पत्रकाराचे नावे घेऊन ती पासेस साठी पोलिसांना दिली त्यामुळे जिल्हा माहिती अधिकार यांचा दुटप्पीपणा उघड झाला असून त्यांनी याबाबत जवाब देणे गरजेचे आहे