Home बुलडाणा आज कोरोना निर्बंधा मुळे देऊळगाव मही येथील आठवडी बाजार बंद

आज कोरोना निर्बंधा मुळे देऊळगाव मही येथील आठवडी बाजार बंद

591

प्रतिनिधी:-( रवि अण्णा जाधव )

देऊळगाव राजा:-देऊळगाव मही येथे दर रविवारी भरणार आठवडी बाजार या रविवार पासून पुढील आदेशापर्यंत कोविड निर्बंधामुळे बंद राहणार असल्याचे ग्राम विकास अधिकारी विजय रिंढे यांनी दवंडी द्वारे आवाहन केले आहे.सध्या शासनाने कोरोना चा वाढता प्रादुर्भाव रोखण्यासाठी निर्बंध घातले आहे त्याचबबोबर गर्दी न करता कोविड नियमांचे पालन करण्याचे आदेश दिले आहे त्यामुळे देऊळगाव मही येथील रविवार ला भरणारा आठवडी बाजार बंद राहणार आहे तसेच नागरिकांनी कोरोना नियमांचे पालन करण्याचे आवाहन करण्यात आले असून कोरोना नियमांचे उल्लंघन करण्याऱ्या विरुद्ध कारवाई करण्यात येईल असे देऊळगाव मही चे ग्रामपंचायत चे ग्रामविकास अधिकारी विजय रिंढे यांनी दवंडी द्वारे कळविले असून कोणीही बाजारात येउन गर्दी करू नये असे आवाहन केले आहे.

बाजारातच करोना येतो का ?

गेल्या दोन वर्षां पासून शासनाने आठवडी बाजार बंद केले आहेत करोना ची लाट आली की आठवडी बाजार बंद होतात बाजारातील व्यापारी हे शेतकरी व गरीब असतात आठवडी बाजार बंद झाल्या मुळे व्यापाऱ्यांच्या कुटुंबाचा उदरनिर्वाह कसा होणार आम्ही आमचा शेत माल कुठे विकायचा असा प्रश्न काही गरीब व्यापारी करत आहे शासनाने घेतलेल्या निर्णयाचा विचार करावा अशी मागणी बाजारातील व्यापाऱ्यांनानि केली आहे ,