Home बुलडाणा प्रेम प्रकरणाचा संशय आला अन , विपरितच घडलं ?

प्रेम प्रकरणाचा संशय आला अन , विपरितच घडलं ?

1721

 

 

तरुणाला सर्वांसमोर चपलांनी मारहान झाल्याने व्यथित तरुणाने गळफास लावून केली आत्महत्या ,

 

रहीम शेख ,

सर्वां समोर चपलानी मारहाण करून अपमानित केल्या मूळे व्यवथीत झालेल्या युवकाने गळफास लावून आपली जीवन यात्रा संपविल्याची धक्कादायक घटना
मोताळ तालुक्यातील पोफळी येथे घडली आहे या संदर्भात पोलीस विभागा कडून मिळालेल्या माहिती नुसार पोफळी येथे काही जणांनी संगणमत करुन
येथील मृतक शेषराव शामराव सुरडकर यास तू अश्विनी सोबत का बोलतो तिच्या सोबत तुझा लफडं आहे तुझा तिच्या बरोबर काही तरी प्रेमप्रकरण आहे असे म्हणून तु अश्विनी सोबत जाऊ नको नाहीतर तुला जीवाने मारून टाकू तसेच तू आता गावात राहू नको अशी धमकी दिली तसेच आरोपींनी मृतक यास सर्वां समोर चप्पलांनी मारहाण करून त्यांचा अपमान केला त्यामुळे त्या तरुणाची गावात बदनामी झाली हे अपमान सहन न झाल्या मुळे तरुणाने गळफास घेऊन आत्महत्या केली अशी तक्रार जानराव शामराव सुरडकर यांनी दिली आहे , या प्रकरणी पोलिसांनी भा द वी 306 , 323 , 506 , नुसार गुन्हा दाखल केला आहे ,
तसेच मृतक शेषराव श्यामराव सुरडकर यांच्या विरुध अश्विनी राहुल इंगळे यांच्या तक्रारी वरुन कलम 354 ड.509 506 व 504 गुन्हा दाखल आहे