Home विदर्भ अकोला बाजार येथील गुणवंत विद्यार्थ्यांना सुनीताबाई दुधे स्मृती पुरस्कार

अकोला बाजार येथील गुणवंत विद्यार्थ्यांना सुनीताबाई दुधे स्मृती पुरस्कार

128
0

पोलीसवाला ऑनलाइन मिडिया

यवतमाळ / अकोला बाजार , दि. २७ :- येथील केंद्रीय प्राथमिक मराठी शाळेच्या सेवानिवृत्त शिक्षीका सुनीताबाई दुधे यांच्या स्मृती प्रित्यर्थ त्यांचे चिरंजीव पत्रकार अविनाश दुधे यांच्या तर्फे गुणवंत विद्यार्थ्यांना पुरस्कार देण्यात आले. प्राथमिक शाळेतील प्रत्येक वर्गातुन प्रथम आलेल्या विद्यार्थ्यांना 26 जानेवारी रोजी हा पुरस्कार देण्यात आला.
नावांमध्ये थोडेफार साम्य असलेल्या विद्यार्थीनी पुरस्कारासाठी लकी ठरल्याचा योगायोग अकोला बाजार येथे आला .

निवड झालेल्या देवयानी गजानन करलुके , देव्यानी सतीश ठाकरे, दिव्यानी देवानंद मडावी , क्रिश गजानन भोंबारे , व लकी अनील घनकर यांना प्रत्येकी एक हजार रूपये रोख , स्मृतीचिन्ह व प्रमाणपत्र देउन गौरविण्यात आले . तसेच सर्वगुण संपन्न विद्यार्थी ओंकार विजय कपाट , सांस्कृतिक क्षेत्रात प्राची सचिन आत्राम, उत्कृष्ट कबड्डीपटु म्हणून साहील सुरेश मोवाडे यांनाही प्रमाणपत्र देउन गौरविण्यात आले.

प्रजासत्ताक दिनानिमीत्य एका कलादर्पण कार्यक्रमात सरपंच अर्चना मोगरे, शाळा व्यवस्थापन समिती अध्यक्ष प्रवीण मोगरे , जिल्हा पत्रकार संघटनेचे तालुकाध्यक्ष हमीदखाॅ पठाण , जनहित विकास मंच चे जिल्हाध्यक्ष विजय कदम , केंद्र प्रमुख गजानन देउळकर, मुख्याध्यापिका मीनाताई दोनाडे यांचे हस्ते विद्यार्थ्यांना पुरस्कार देण्यात आले. यावेळी अनील कराळे , ज्योत्स्ना टेकाळे , विजय डाखोरे, बाबाराव देवकते, प्रवीण राठोड, अनीता घनकर, चंद्रकांत नांगलीया , देवानंद मडावी , मनीषा वाघाडे उपस्थित होते. कार्यक्रमाचे संचालन उदय जोशी, प्रास्ताविक मुख्याध्यापक राधेश्याम चेले व आभार ढगे यांनी मानले.

Previous articleमोफत नेत्ररोग तपासणी व शस्त्रक्रिया शिबिर-फाउंडेशन च यशस्वी पाचवं वर्ष
Next articleमुंबईत मैत्रेय गुंतवणूकदारांचे आंदोलन चिघळले पोलिस प्रशासनाने मंत्रालयासमोर निदर्शनेकर्त्यांना उचलून उपोषणस्थळी हलविले
भारत सरकारने फेब्रुवारी 2021 पासून अधिसूचित केलेल्या नव्या माहिती तंत्रज्ञान (मध्यस्थ मार्गदर्शक सूचना आणि डिजिटल माध्यमांसाठीची आचार संहिता) नियम 2021 अंतर्गत असलेल्या डिजिटल माध्यमांसाठीच्या आचार संहितेचे आम्ही पालन करतो. तरीही एखाद्या बातमीविषयी आपली तक्रार असल्यास आमच्या वेब माध्यमचे तक्रार निवारण अधिकारी आणि स्वनियमन संस्थेकडे विहित नमुन्यात अर्ज करू शकता. आपल्या तक्रारीचे निराकरण केले जाईल.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here