Home बुलडाणा किराणा दुकानात टाकलेल्या धाडीत शस्त्र साठा गुटखा दारू जप्त ,

किराणा दुकानात टाकलेल्या धाडीत शस्त्र साठा गुटखा दारू जप्त ,

362

 

आरोपी जेरबंद ,

बुलडाणा ,

खामगाव येथील अप्पर पोलीस अधीक्षक यांच्या विशेष पथकाने शनिवारी रात्री नांदुरा तालुक्यातील तिकोड़ी येथे देशी विदेशी दारू , शस्त्र व गुटखा जप्त करण्यात यश मिळविले असून एका आरोपीस जेरबंद करण्यात आले आहे .

अपर पोलिस अधीक्षक यांच्या पथकाला गुप्त बातमी दाराकडून खबर मिळाली की नांदुरा तालुक्यातील ग्राम तिकोडी येथे एक व्यक्ती अवैधरित्या विनापरवाना शस्त्र तसेच देशी – विदेशी दारू व महाराष्ट्र शासनाने प्रतिबंधित केलेला गुटखा बाळगत आहे . या माहितीच्या आधारे पथकाने ग्राम तिकोडी येथे असणा – या राजू बडे यांच्या जगदंबा किराणा दुकान व घरामध्ये धाड टाकली असता त्या ठिकाणी महाराष्ट्र शासनाने प्रतिबंधित केलेला तसेच मानवी आरोग्यास अपायकारक असलेला गुटखा किंमत २३ हजार ७६० रुपये , देशी विदेशी दारू किंमत १३ हजार १ ९ ० रुपये तसेच तीन तलवारी व एक मोठा चाकू किंमत ६००० रुपये व नगदी २५३० रुपये असा एकूण ४५ हजार ४८० रुपयांचा मुद्देमाल पोलिसांनी जप्त करून आरोपी राजू बडे याचे विरुद्ध नांदुरा पोलिस स्टेशन येथे गुन्हा दाखल करण्यात आलं आहे