
🔵➡️ यवतमाळच्या जिल्हा व सत्र न्यायालयात 10 जानेवारी 2022 रोजी सोमवारी सुणावणी..?
( अयनुद्दीन सोलंकी )
घाटंजी / यवतमाळ – घाटंजी तालुक्यातील गोविंदपुर येथील स्वरा मेटल्स गिट्टीखदानचे (यवतमाळ) दिवांजी व चिखलवर्धा ग्रामपंचायतचे उपसरपंच आकाश भगवान नडपेलवार विरुद्ध फिर्यादी चिखलवर्धा येथील ग्रामपंचायतच्या सरपंच वर्षा भिमराव कणाके हिच्या तक्रारीवरून पारवा पोलीसांनी संशयीत आरोपी चिखलवर्धा येथील ग्रामपंचायतचे उपसरपंच व स्वरा मेटल्स गिट्टीखदानचे दिवांजी आकाश नडपेलवार विरुद्ध अँट्रोसिटी अँक्ट 3 (1) (r), 3 (1) (s) अनुसूचित जाती जमाती अत्याचार प्रतिबंधक कायदा तसेच भादंवि कलम – 504 अंतर्गत गुन्हा दाखल केला होता. सदर प्रकरणात पांढरकवडा येथील उप विभागीय पोलीस अधिकारी प्रदीप पाटील यांनी सदर प्रकरणाचा सखोल तपास केला होता. मात्र, सदर गुन्ह्याच्या तपासाअंती फिर्यादी सरपंच वर्षा भिमराव कणाके हीने दाखल केलेली तक्रार खोटी असल्याचे निष्पन्न झाल्याने सदर प्रकरणात यवतमाळच्या विशेष न्यायालय व जिल्हा व सत्र न्यायालयात “ब” वर्ग समरी फायनल 24 डिसेंबर 2021 रोजी दाखल केला आहे.
दरम्यान, फिर्यादी तथा चिखलवर्धा येथील ग्रामपंचायतच्या सरपंच वर्षा कणाके हिची “ब” वर्ग समरी फायनल दाखल प्रकरणात प्रतिक्रिया घेतली असता, पांढरकवडा येथील उप विभागीय पोलीस अधिकारी यांनी विशेष न्यायालय तथा जिल्हा व सत्र न्यायालयात दाखल केलेल्या “ब” वर्ग समरी फायनल दाखल प्रकरणात आपण जिल्हा व सत्र न्यायालयात आक्षेप दाखल केलेला असुन उपसरपंच आकाश नडपेलवार व सचिव पी. सी. दौड आदीं विरुद्ध अतिरिक्त गुन्हे नोंदविण्याची मागणी करणार असल्याचे त्यांनी स्पष्ट केले आहे. तसेच सदर प्रकरणाची पुढील सुनावणी 10 जानेवारी 2022 रोजी म्हणजे सोमवारी होणार आहे. या मुळे सदर प्रकरणात जिल्हा व सत्र न्यायालयात काय निर्णय लागेल, या कडे घाटंजी तालुक्यातील राजकीय व ईतर नागरिकांचे लक्ष लागले आहे.
⚫ घाटंजी तालुक्यातील चिखलवर्धा येथील ग्रामपंचायतची मासीक सभा 10 मार्च 2021 रोजी सरपंच वर्षा भिमराव कणाके हिच्या अध्यक्षतेखाली आयोजित करण्यात आली होती. मात्र, उपसरपंच आकाश नडपेलवार यांनी उपसरपंच यांचा रबर स्टॅम्प मारुन त्यातील उप हा शब्द खाडाखोड करुन सरपंचाचा खोटा रबर स्टॅम्प तयार करुन सरपंचाची खोटी सही करून पांढरकवडा येथील आदिवासी विकास प्रकल्प कार्यालयात सिंमेट काँक्रिट रस्ता,नाली व ईतर बांधकाम मंजुर करण्यासाठी खोटा व बनावट ठराव ग्रामसेवक पी. सी. दौड यांच्या हस्ताक्षरात तयार करून सादर केल्याचे सरपंच वर्षा कणाके हिला समजले. त्यावरुन सरपंचाचा खोटा रबर स्टॅम्प व सरपंचाची खोटी सही करून खोटा व बनावट ग्रामपंचायतचा ठराव दाखल केल्या प्रकरणी सरपंच वर्षा कणाके हीने उप कार्यकारी अधिकारी, जिल्हा परिषद यवतमाळ येथे लेखी तक्रार लेखी तक्रार दाखल केली होती. सदर प्रकरणात कोणतीही चौकशी वा कारवाई न झाल्याने अखेर सरपंच वर्षा कणाके हीने उपसरपंच आकाश नडपेलवार व ग्रामसेवक पी. सी. दौड विरुद्ध पारवा पोलीस ठाण्यात जातीवाचक शिवीगाळ करून खोटा व बनावट ठराव तयार करुन शासनाची दिशाभूल व फसवणुक करण्याचा प्रयत्न केल्याची लेखी तक्रार पारवा पोलीस ठाण्यात दाखल केली. मात्र, सदर प्रकरणात फक्त उपसरपंच आकाश भगवान नडपेलवार विरुद्ध अँट्रोसिटी अँक्ट नुसार गुन्हा दाखल करण्यात आला. मात्र, ग्रामसेवक पी. सी. दौड यांच्या विरुद्ध कोणतीही गुन्हा व कारवाई करण्यात आलेली नाही. त्यामुळे 2 आँक्टोंबर 2021 रोजी सरपंच वर्षा भिमराव कणाके हिने पुन्हा दुसरी लेखी तक्रार पारवा पोलीस ठाण्यात दाखल करुन उपसरपंच आकाश नडपेलवार व ग्रामसेवक पी. सी. दौड यांचे विरुद्ध दाखल केली होती. मात्र, सदर तक्रारीवरुन कोणतीही चौकशी वा कारवाई करण्यात आली नाही, असा आरोप सरपंच वर्षा कणाके हिने केला होता.
⚫ मात्र, आरोपी आकाश भगवान नडपेलवार विरुद्ध दाखल अँट्रोसिटी अँक्ट गुन्हयात उप विभागीय पोलीस अधिकारी प्रदीप पाटील यांनी केलेल्या तपासात सदर तक्रार खोटी असल्याचे निष्पन्न झाल्याने यवतमाळच्या विशेष न्यायालय तथा जिल्हा व सत्र न्यायालयात “ब” वर्ग समरी फायनल दाखल केला आहे. सदर प्रकरणाची पुढील सुनावणी सोमवारी होणार आहे.










































