Home बुलडाणा ग्रामसेवकाचे अनेक प्रलंबित कामे संघटनेच्या माध्यमातून निकाली काढली

ग्रामसेवकाचे अनेक प्रलंबित कामे संघटनेच्या माध्यमातून निकाली काढली

175

ग्रामसेवक संघटनेचे जिल्हाध्यक्ष अशोक बुरकुल यांची माहिती

भगवानराव साळवे 

सिंदखेड राजा
ग्रामीण विकासाला चालना देण्यासाठी ग्रामसेवकाचे योगदान फार मोठे आहे मात्र ग्रामविकासाची कामे करताना प्रशासकीय स्तरावर ग्रामसेवकाच्या अनेक समस्या प्रलंबित असतात त्या समस्यां शासकीय पातळीवर निकाली काढण्यासाठी ग्रामसेवक संघटनेच्या माध्यमातून आपण कटिबद्ध असल्याचे ग्रामसेवक संघटनेचे जिल्हाध्यक्ष अशोक बुरकुल यांनी माहिती दिली
जिल्हाध्येक्षअशोक बुरकुल यांनी जिल्हाध्यक्ष पदाचा कार्यभार घेतल्यानंतर ग्रामसेवकांच्या विविध समस्या सोडविण्यासाठी प्राधान्याने काम करत आहेत गत सहा महिन्यांमध्ये 112 ग्रामसेवकांना कालबद्ध पदोन्नती मिळून दिली 554 ग्रामसेवकांना सताईत्व प्रमाणपत्र देऊन सेवेत कायम केले 9 निलंबित ग्रामसेवकांना कामावर घेतले 21 ग्रामसेवकांना ग्राम विकास अधिकारी म्हणून पदोन्नती मिळवुन दिली 122 ग्रामसेवकांना हिंदी मराठी सुटचे प्रमाणपत्र देण्यात आले सुरक्षा ठेव अनामत रक्कम दहा ग्रामसेवकांना परत केली तेरा तालुक्‍यातील ग्रामसेवकांना जीपीएफ च्या स्लीपचे वाटप केले तसेच लवकरच विस्तार अधिकारी यांचे प्रमोशन तसेच आदर्श ग्रामसेवक पुरस्कार वितरण यासह ग्रामसेवकाचे विविध प्रलंबित प्रश्न निकाली काढणार असल्याचे ग्रामसेवक संघटनेचे जिल्हाध्यक्ष अशोक बुरकुल यांनी सांगितल्याने ग्रामसेवका मध्ये आनंदाचे वातावरण निर्माण झाले आहे