Home महत्वाची बातमी बुलडाणा जिल्ह्यात जिल्हाधिकाऱ्यांनी काढले लोकडाऊन चे आदेश

बुलडाणा जिल्ह्यात जिल्हाधिकाऱ्यांनी काढले लोकडाऊन चे आदेश

172
0

अखेर लोकडाऊन चे आदेश आलेच ,

 

पर्यटन स्थळांवर जमावबंदी लागू…लग्नात 50 आणि अंत्यसंस्काराला 20 जणांची मर्यादा

अमीन शाह

बुलडाणा ,

ओमायक्रॉनचा वाढता वेग लक्षात घेता बुलडाणा जिल्हा प्रशासनाने प्रतिबंधात्मक उपाययोजनांना प्रारंभ केला आहे. आज यासंदर्भात बुलडाणा जिल्हाधिकारी यांनी लॉकडाऊन आदेश पारित केला आहे. त्यानुसार लग्न समारंभ बंदिस्त जागेत असो की, खुल्या जागेत त्याठिकाणी 50 ची मर्यादा राहील. मर्यादित संख्येचा हाच नियम राजकीय, धार्मिक, सांस्कृतिक कार्यक्रमांना राहील. अंत्यसंस्कार विधी मध्ये जास्तीत जास्त 20 जण उपस्थित राहू शकतील तर मोकळ्या जागांमध्ये तसेच पर्यटन स्थळांवर कलम 144 लागू करण्यात आली आहे. अर्थात याठिकाणी जमावबंदी करता येणार नाही. 4 किंवा त्यापेक्षा जास्त लोकांना जमा होता येणार नाही. या आदेशाचे निर्वहन करण्याची जबाबदारी पोलिस प्रशासन आणि स्थानिक स्वराज्य संस्थांची राहील, असे जिल्हाधिकारी राममूर्ती यांनी आदेशात नमूद केले आहे.