Home विदर्भ पटलधामल वाधवाणी फार्मसी महाविद्यालयाला अटल रैंकिंगचे मानांकन प्राप्त

पटलधामल वाधवाणी फार्मसी महाविद्यालयाला अटल रैंकिंगचे मानांकन प्राप्त

158

यवतमाळ स्थानिक पी वाधवाणी फार्मसी महाविद्यालयास अटल रँकींग ऑफ इंन्स्टीटयुशनल ऑन इनोव्हेशन शिक्षण मंत्रालय भारत सरकार व्दारा महाविद्यालय ( खाजगी विनाअनुदानीत ) प्रवर्गात ‘ ब्रँड प्रॉमिसींग मानांकन प्राप्त झाले आहेत , महाविद्यालयातील सर्व विभागाचे शैक्षणिक उपक्रम भौतीक सोयी सुविधा नाविण्यपुर्ण उपक्रम विद्यार्थ्याची प्रगती प्रशासकिय बाबी अशा अनेक गोष्टींची तपासनी केली शिक्षकांनी व विद्यार्थ्यांनी सहभाग घेतलेले राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय स्तरावरील कार्यशाळा , चर्चासत्र , महाविद्यालयाला प्राप्त पेटेंट , पेटेंट पब्लीकेशन इत्यादी गोष्टींचा सहभाग होता हे मानांकन मिळाल्यामुळे संस्थेच्या शिरपेचात आणखी एक मानाचा तुरा रोवला गेला आहे . स्थापनेपासुन या संस्थेने विद्यार्थ्याच्या सर्वागिन विकासाकरीता हातभार लावला आहे ब्रेड प्रॉमिसींग अटल रॅकींग ऑफ इंन्स्टीटयुशनल ऑन इनोव्हमेन्ट मानांकन झाल्याबदल संस्थेचे अध्यक्ष श्री जगदिशजी वाधवाणी यांनी संस्थेचे प्राचार्य डॉ अनिल चांदेवार व सर्व शिक्षक व शिक्षकेत्तर कर्मचा – यांना अभिनंदन केले . प्राचार्य डॉ अनिल चांदेवार यांच्या मार्गदर्शनाखाली प्रा . सुरज लांडगे व प्रा . चंद्रशेखर गादेवार यांनी काम पाहीले .