Home मराठवाडा तिरंगा झेंड्याचा अवमान केल्या प्रकरणी आ. राजूरकर, डी. पी. सावंत , जिल्हाधिकारी...

तिरंगा झेंड्याचा अवमान केल्या प्रकरणी आ. राजूरकर, डी. पी. सावंत , जिल्हाधिकारी डोंगरे यांच्या विरोधात तक्रार

154

पोलीसवाला ऑनलाइन मिडिया

वंचित बहुजन आघाडीचे वजिराबाद पोलिसांना निवेदन…!!

राजेश भांगे

नांदेड , दि. २७ :- प्रजास्त्तक दिनी तिरंगा झेंड्याचा अवमान केल्या प्रकरणी आ. अमरनाथ राजूरकर , माजी मंत्री डी.पी.सावंत , जिल्हाधिकारी अरुण डोंगरे आदींवर गुन्हे दाखल करा अशी मागणी वंचित बहुजन आघाडीच्या वतीने करण्यात आले आहे.

या मागणीचे निवेदन काल वजिराबाद पोलिस ठाण्यात देण्यात आले आहे.
प्रजासत्ताक दिनी महानगरपालिकेत ध्वजारोहण करण्यात आले. यावेळी काढण्यात आलेल्या तिरंगा रांगोळीवर जिल्हाधिकारी अरुण डोंगरे यांच्यासह आ. अमरनाथ राजूरकर , माजी मंत्री डी.पी सावंत , विकास धबाले , विजय यवनकर , यांच्यासह महापालिकेचे अधिकारी बुटसह पाय देवून उभे असल्याचा फोटो काल सोशल मीडियावर व्हायरल झाला होता.

त्यानंतर या प्रकरणी तिरंगा झेंड्याचा अवमान करणाऱ्या संबंधित लोकप्रतिनिधी , माजी लोकप्रतिनिधी आणि अधिकाऱ्यांवर तात्काळ गुन्हे दाखल करावेत अशी तक्रार आहे वंचित बहुजन आघाडीचे जिल्हाध्यक्ष डॉक्टर संघरत्न कुऱ्हे , राज हटकर , के .एच .वने अशोक कापशीकर , डॉक्टर सिद्धार्थ भेदे कौशल्याबाई रणवीर आदींनी वजिराबाद पोलिसांकडे निवेदनाद्वारे केली आहे.