Home विदर्भ खैरगाव ग्रामस्थांनी व्यक्त केली नाराजी पदाधिकारी वर नाराजीचा सूर

खैरगाव ग्रामस्थांनी व्यक्त केली नाराजी पदाधिकारी वर नाराजीचा सूर

144

गावामध्ये ग्रामपंचायत मध्ये प्रजासत्ताक दिन उत्साहात साजरा…!!

प्रतिनिधी – मनोज गोरे

चंद्रपुर , दि. २६ :- गावामध्ये ग्रामपंचायत पातळीवर व स्थानिक प्रशासकीय कार्यालयात प्रजासत्ताक दिनांचा कार्यक्रम मोठ्या उत्साहात साजरा केला जातो मात्र कोरपना तालुक्यातील खैरगाव या गावांमध्ये 2016 व 17 मध्ये ग्रामपंचायत भवन मोठ्या दिमाखात इमारत बांधण्यात आली मात्र या ग्रामपंचायत कार्यालयासमोर ध्वजारोहन चौथरा बांधान्यात आला नाहीत त्यामुळे जुन्या ग्रामपंचायत च्या इमारतीसमोर ध्वज फडकवला जातो मात्र त्याच जुन्या इमारतीमध्ये r o पाण्याचा प्लांट आहे त्यामुळे गावातील नागरिकांनी अनेकदा नवीन इमारतीसमोर ध्वजारोहणाचा ओटा

बनवून घ्यावा याकरिता मागणी केली असून देखील याकडे ग्रामपंचायत पदाधिकाऱ्यांनी जाणीवपूर्वक दुर्लक्ष करीत आहेत गावाच्या विकासाकरता ग्रामपंचायत निर्मिती केली जाते त्या ग्रामपंचायतीसमोर ध्वज फडकविला जाता नाही ही खेदाची बाब आहे असे मत ग्रामस्थांनी मांडले या समोर ग्रामपंचायत कार्यालय यासमोरच ध्वजारोहण करण्यात यावे अशी मागणी रेटून धरली यावेळी गावातील नागरिक सुभाष पांडुरंग राजूरकर, सुरज गणपत मडावी देविदास मारुती कुसराम विठ्ठल भीमराव बालाजी लक्ष्‍मण मडावी राहुल कवडू सलाम संजीव भाऊराव मडावी नितेश गोपाल मला सुनील देवराव श्रीराम शंकर अरविंद उत्तम मडावी रमेश यशवंत उपस्थित होते.