
देऊळगाव मही :-मागील १२वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात आपल्या लिखाणातून आपली आगळी वेगळी ओळख निर्माण करून उत्कृष्ट कामगिरी करणारे पत्रकार संतोष जाधव देऊळगाव मही यांना नुकताच राज्यस्तरीय पुरस्कार जाहीर करण्यात आल्याची घोषणा ऑल जर्नालिस्ट ऑड फ्रेड सर्कल संघटना केंद्रीय अध्यक्ष यासिन पटेल व प्रदेश अध्यक्ष अजिंक्य गोवेकर यांनी केली. पत्रकारिता बरोबरच जीवनसाथी फाउंडेशनच्या वतीने सामाजिक कार्यात ते सदैव अग्रेसर राहतात.निःपक्ष,निर्भीड, आणि लोकहिताचे लिखाण करणे अशी संतोष जाधव यांची ओळख आहे. सदर पुरस्कार येत्या १५ व १६ नोव्हेंबर रोजी अंत्री ( अकोला ) येथे मान्यवरांच्या हस्ते प्रदान करण्यात येणार आहे.











































