Home वाशिम अवघ्या २४ तासात जबरी चोरीचा गुन्हा ऊघड,आरोपिंना केले जेरबंद

अवघ्या २४ तासात जबरी चोरीचा गुन्हा ऊघड,आरोपिंना केले जेरबंद

244

स्थानिक गुन्हे शाखा वाशिमची धडाकेबाज कारवाई


वाशिम:- स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने २४ तासात जबरी चोरीचा गुन्हा उघडकीस आणुन आरोपींना अटक करून चोरीस गेलेला माल हस्तगत केला.त्यांच्या या धडाकेबाज कारवाईने पोलीस दलाचे सर्वत्र कौतुक होत आहे.
द ग्रेट शिलेदार म्हणून ओळख असलेल्या स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने २४ तासात जबरी चोरीचा गुन्हा उघडकीस आणुन आरोपींना अटक करून चोरीस गेलेला माल हस्तगत केला.त्यांच्या या धडाकेबाज कारवाईने पोलीस दलाचे सर्वत्र कौतुक होत आहे,सविस्तर घटना अशी की, दिनांक १०/११/२०२१ रोजी फिर्यादी अभिजीत गणेश धनबर यांनी पोस्टे रिसोड येथे रिपोर्ट दिला की त्याचा मित्र गौरव देशमुख याचे मो.नं. वरून कॉल आला व सांगीतले की माझे जवळ अर्धा किलो सोने आहे ते तुम्हाला ५,००,००० / – रूपयामध्ये देतो असे म्हणुन फिर्यादी व साक्षीदार गौरव देशमुख यांना ३ अनोळखी इसमाने काठीने मारहाण करून फिर्यादीस जखमी करून त्यांचे जवळील ५०० रू च्या १००० नोटा असे एकुण ५,००,००० / – रू ठेवलेली पिवळ्या रंगाची स्कुल बॅग जबरदस्तीने हीसकावुन घेवुन त्यांचे सीडी डीलक्स क्र . ५२८८ मोटार सायकलने घेवुन पळुन गेले . अशा रिपोर्ट वरून पोलीस स्टेशन रिसोड येथे अप.क. ७८३ / २१ कलम ३ ९ ४,३४ भादविचा गुन्हा दाखल करण्यात आला .पोलीस अधिक्षक बच्चन सिंह यांच्या मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे शाखा पोलीस निरीक्षक जाधव यांनी सदर गुन्हयाचे तपासाबाबत स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकास आदेश देवुन रवाना केले, असता स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने गोपनिय माहितीच्या आधारे आरोपी नामे १ ) सुनिल मनोहर भोसले , वय ३८ वर्ष २ ) संजय बबन भोसले , वय २३ वर्षे ३ ) राजु मनोहर भोसले वय २ ९ वर्षे सर्व रा.मोठेगांव ता.रिसोड जि.वाशिम यांना ग्राम अंत्री देशमुख ता . मेहकर जि . बुलढाणा येथुन गुन्हयात चोरीस गेलेले नगदी ४,४७,५०० / – रू व एक मोटर सायकल किंमत ५०००० / – रू ची असा एकुण ४ , ९ ७,५०० / – रू चा मुददेमाल ताब्यात घेवुन गुन्हयाचे संदर्भात सखोल विचारपुस केली असता सदर गुन्हयातील आरोपीनी गुन्हयाची कबुली दिल्याने आरोपी कडुन चोरीस गेलेला माल हस्तगत करून पुढील तपास कामी नमुद आरोपी यांना पोलीस स्टेशन रिसोड यांचा ताब्यात देण्यात आले आहे . सदर कारवाईत पोलीस अधिक्षक बच्चन सिंह , अपर पोलीस अधिक्षक गोरख भामरे यांचे मार्गदर्शनात पोलीस निरीक्षक सोमनाथ जाधव , सपोनि विजय जाधव , पोहवा सुनिल पवार , पोना राजेश गिरी , अश्वीन जाधवराम नागुलकर , पोशि शुभम चौधरी , चालक पोना गजानन जाधव सायबर सेल महेश वानखेडे यांनी सहभाग नोंदविला नमुद गुन्हयाचा पुढील तपास पोलीस स्टेशन रिसोड हे करीत आहेत.

प्रतिनीधी:-फुलचंद भगत
मंगरूळपीर/वाशिम
मो.8459273206