
ठाणेदार अशोक लांडे यांची कामगिरी ,
प्रा , तंजीम हुसेन ,
चिखली : *दररोज शहरात मोटरसायकल चोरीचे प्रमाण वाढले आहेत चिखली पोलीस स्टेशन अंतर्गत दोन मोटरसायकल चोरांना जेरबंद करण्यात येऊन चोरीच्या चार मोटारसायकली जप्तीची कारवाई करण्यात आली.या संदर्भात पोलीस विभागा कडून मिळालेल्या माहिती नुसार पोलिसांना मिळालेल्या गुप्त माहिती च्या आधारे साखरखेर्डा येथील रहिवासी नारायण अशोक खरात व विनोद दिगंबर गायकवाड हे चोरीच्या दुचाकी कमी किमतीत विकत आहे मिळालेल्या माहितीच्या आधारे येथील ठाणेदार अशोक लांडे यांनी वरील दोघांना ताब्यात घेतले व विचारपूस केली असता आरोपींनी अन्य एका साथीदारांसह वेगवेगळ्या ठिकाणावरून मोटारसायकल चोरी केल्याची कबुली दिली असून अजूनही काही मोटारसायकली जप्त होऊ शकतात. अशी माहिती पोलीस विभागा कडून प्राप्त झाली आहे , सदर कार्ययवाही मुळे चिखली शहरातील नागरिकांनी पोलीसांचे कौतुक केले आहेत . सदरची कार्यवाही पोलीस अधीक्षक श्री अरविंद चावरीया , अपर पोलीस अधीक्षक श्री बजरंग बनसोडे , उपविभागीय पोलीस अधिकारी श्री सचिन कदम यांचे मार्गदर्शनात पोलीस निरीक्षक अशोक लांडे यांचे नेतृत्वात पोउप नि धनंजय इंगळे पो हे कॉ अताउल्ला खान , विजय किटे , युवराज राठोड , सुनिल रिंढे , कडुबा मुंढे , सुनिल राजपुत , अजय ईटावा , मपोकॉ मंजुषा चिंचोले यांनी केली . सदर गुन्हयांचा तपास स पो , नी , सुरेश हुडेकर व पो काँ सागर कोल्हे हे करीत आहे











































