Home बुलडाणा ईस्तोत निवड झालेल्या त्या तरुणाचा पाडळी शिंदे येथे पार पडला सत्कार सोहळा

ईस्तोत निवड झालेल्या त्या तरुणाचा पाडळी शिंदे येथे पार पडला सत्कार सोहळा

181

जिद्द व चिकाटी आपल्या ध्येया पर्यन्त पोहचवते:उपविभागीय अधिकारी अहिरे यांचे प्रतिपादन

हनिफ शेख ,

अंढेरा(प्रतिनिधी):-नुकतीच इस्रो मध्ये निवड झालेले शिवणी आरमाळ येथील रहिवासी असलेले श्री निखिल दत्तु आरमाळ यांचा पाडळी शिंदे येथिल समस्त गावकरी मंडळी यांच्या वतीने दि 8/10/2021 रोजी १ते ४पर्यंत प्राथमिक शिक्षण जिल्हा परिषद उच्च प्राथमिक शाळा पाडळी शिंदे येथे झाल्याने ईसरो मध्ये निवड झाल्याने पाडळी शिंदे येथील ग्रामस्थ यांच्या वतीने जाहीर सत्कार सोहळा आयोजित केला होता या कार्यक्रमाचे अध्यक्षस्थान उपविभागीय अधिकारी श्री भुषण अहिरे साहेब सिंदखेडराजा, यांनी भूषविले तर प्रमुख पाहुणे म्हणून गटविकास अधिकारी इंगळे साहेब देऊळगाव राजा, गटशिक्षणाधिकारी दादाराव मुसदवाले साहेब देऊळगावराजा,
केंद्र प्रमुख मुळे साहेब अंढेरा
तथा केंद्र प्रमुख बुरुकुल सर( दे.मही) तथा निखिल चे आई वडील आजी आजोबा आदी मान्यवर उपस्थित होते,
कार्यक्रमाचे सूत्र संचलन श्री अवसरमोल सर यांनी केले तर प्रस्तावित श्री तेजनकर सर यांनी केले .प्रसंगी गटशिक्षणाधिकारी मुसदवाले साहेब बोलताना म्हणाले की खरी गुणवत्ता ही ग्रामीण भागात आणि प्रामुख्याने जिल्हा परिषद शाळेतच असते फक्त विद्यार्थ्यांना योग्य वेळी योग्य दिशा आणि योग्य मार्गदर्शन मिळणे गरजेचे असते,यावेळी भारत शिंदे पोलीस पाटील,निखिल आरमाळ,यांची सुद्दा समोचित भाषणे झाली.
त्यानंतर अध्यक्षीय भाषणात बोलताना भुषण आहिरे साहेब यांनी विद्यार्थ्यांना संबोधित करतांना म्हणाले की विद्यार्थ्यांनी स्वतःतील न्यूनगंड बाजूला सारून अभ्यासाची कास धरून आपले एक ध्येय निश्चित करावे अनि अपयशाला घाबरून न जाता निखिल प्रमाणे जिद्द व चिकाटीने आपल्या ध्येया पर्यन्त पोहचावे तसेच निखिल चे इतरही अनेक सत्कार होतील परंतु प्राथमिक शिक्षण झालेल्या शाळेतील गावकऱ्यांनी केलेल्या सत्कार चे मोल सर्वाधिक असून निखिल ला सतत प्रेरणा देत राहील तसेच ग्रामीण भागातील विद्यार्थी यांनी निखिल ची प्रेरणा घेऊन ग्रामीण भागातील विद्यार्थी हे सर्वच्य स्थान गाठू शकतात …प्रसंगी
वरील मान्य वरांच्या तथा गावकऱ्यांच्या हस्ते निखिल आरमाळचा जंगी सत्कार समारंभ उत्साहात साजरा करण्यात आला..
कार्यक्रमाचे आभार प्रदर्शन श्री स्वप्नील शिंदे (पत्रकार) यांनी केले
आणि उपस्थितांना अल्पोपहार देऊन कार्यक्रमाची सांगता करण्यात आली
प्रसंगी अंढेरा केंद्रातील सर्व मु.अ . प्रा शाळा पाडळी शिंदे सर्व शिक्षक, तलाठी मदन जारवाल, ग्रामसेवक दीपक बोडखे,पत्रकार खंडू मानटे,ज्ञानेश्वर म्हस्के,पोलिस पाटील भारत शिंदे, सरपंचपती श्रीकृष्ण शिंदे, शाळा व्यवस्थापन समिती अध्यक्ष दत्तात्रय शिंदे, तंटामुक्ती अध्यक्ष रवींद्र बापू शिंदे,उपसरपंच अरुण जाधव यांच्या सह पाडळी शिंदे येथील ग्रामस्थ विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते,