Home बुलडाणा सिंनगाव जहागीर जिल्हापरिषद सर्कल;युवा नेतृत्व अमोल काकड मैदानात.!

सिंनगाव जहागीर जिल्हापरिषद सर्कल;युवा नेतृत्व अमोल काकड मैदानात.!

825

 

पंकजा ताई आणि जाणकारांचा आशीर्वाद; देणार का प्रस्तापितांना मात..

देऊळगाव राजा/(आदिल खान पठाण ):- तालुक्यातील सिंनगाव जहागीर जिल्हा परिषद सर्कल निवडणूक तोंडावर येऊन ठेपली असून सर्व पक्ष कामाला लागले आहे.यातच एक ग्रामीण भागातून संघर्ष करत पुढे आलेलं युवा नेतृत्व अमोल काकड यांनी ही जिल्हा परिषद सर्कल सिंनगाव जाहगीर साठी मैदानात उडी घेतली आहे.अमोल काकड हे रा.स.प चे बुलडाणा जिल्हा अध्यक्ष आहे.काकड हे रा.स.प चे अध्यक्ष मा.महादेव जानकर यांचे निष्ठावंत व अतिशय निकटवर्तीया मधून आहे.नुकतेच रा.स.प आमदार रत्नाकर गुठ्ठे यांनी एका व्हिडिओ च्या माध्यमातून रा स प जिल्हा परिषद निवडणूक ताकदीने लढणार कामाला लागा असे आव्हान अमोल काकड यांच्या भेटी दर्मीयान केलं. तसेच स्व.गोपीनाथ मुंढे यांना दैवत मानणारे अमोल काकड हे पंकजा ताई मुंढे यांचे कट्टर समर्थ म्ह्णून ओळखले जातात तसेच काकड हे पंकजा ताई मुंडे विचारमंच चे महाराष्ट्र राज्य, संस्थापक अध्यक्ष,ओबीसी ऑर्गनायझेशन इंडिया चे जिल्हाध्यक्ष बुलढाणा म्हणून सामाजिक राजकीय क्षेत्रात उल्लेखनीय काम करतात.सामान्य जनतेच्या समस्या,हॉस्पिटलमधील समस्या,शासकीय कार्यलय असो व इतर कुठे ही जिथे गरज भासली तिथे काकड प्रत्येकाला सहकार्य करत असतात.आणि आता काही महिन्यात येणाऱ्या जि प निवडणुकीत अमोल काकड यांनी मांडी थोपटली आहे ,काकड यांच्या इन्ट्री ने समाजाचे,मालक होऊन बसलेल्या प्रस्थापितांचे धाबे दणाणले आहे.
काकड याच्या बाजूने अनुकूल वातावरण असून युवकांमध्ये काकड यांची लोकप्रियता दिसून येत आहे.
तसेच आजच्या काळात अत्यंत महत्वाचा माध्यम फेसबुक ,व्हाट्सएपच्या माध्यमातून काकड हे समाजातील घडत असलेल्या ग्रामीण शहरी भागाच्या अन्याय अत्याचाराव आपले रोखठोक मत व्यक्त करून अन्यायग्रस्त लोकांना न्याय देण्याचा प्रयत्न करत असतात त्याची अनेक उदाहरण आहेत.
काकड च्या रूपाने सिंनगाव जाहगीर मध्ये तरुण पहिलवान मैदानात आला असून तो आता कोणाला चित करतो हे येणाऱ्या काळात स्पष्ट होईलच.
———–

आमच्या प्रतिनिधी शी बोलतांना अमोल काकड यांनी सांगितले मा.पंकजाताई मुंडे यांनी माझ्या आशीर्वाद सह पूर्ण ताकत तुमच्या पाठीशी आहे असे मत व्यक्त केले.महत्वाचं म्हणजे काकड यांच्या प्रचारासाठी सिंनगाव सर्कल मध्ये मा. पंकजाताई मुंडे स्वतः प्रचार सभा घेणार असल्याचे रा .स.प जिल्हा अध्यक्ष तथा कट्टर मुंढे समर्थक अमोल काकड यांना एका भेटी दर्मीयान मुंढे यांनी सांगितले   ,अमोल काकड यांचा हे मा.पंकजा मुंढे यांच्या सोबत चर्चा  करतांना चा एक व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर बघायला मिळत आहे तसेच रासप आमदार रत्नाकर गुठ्ठे यांनी ही रासप ची संपूर्ण ताकत अमोल काकड यांच्या पाठीशी असल्याचे स्पष्ट केले आहे यामुळे सिंनगाव जहागीर जि प सर्कल ला आपली जहागीरी समजणाऱ्या प्रस्तापितांचे धाबे नक्कीच दणाणले आहे