Home बुलडाणा देऊळगाव राजा चिखली महामार्ग बंद खडकपूर्णा धरणाचे सर्व 19 दरवाजे उघडले ,

देऊळगाव राजा चिखली महामार्ग बंद खडकपूर्णा धरणाचे सर्व 19 दरवाजे उघडले ,

632

(रवि जाधव)
देऊळगाव राजा:-सततच्या पावसामुळे खडकपूर्णा प्रकल्पात पाण्याचा प्रचंड वाढला आहे. परिणामी धरणाचे सर्व १९ दरवाजे १.५० मिटरणे उघडण्यात येत आहे. त्यामुळे देऊळगाव राजा – चिखली रस्त्यावरील पुलावरून पाणी वाहणार आहे. त्यामुळे दे.राजा – चिखली रस्ता वाहतुकीसाठी प्रशनासाच्या वतीने बंद करण्यात येत आहे , अशी माहिती पाटबंधारे विभागाने दिली आहे. कुणीही पाण्यातून पुलावरून वाहन नेवू नये, असे आवाहन प्रशासनाच्या वतीने करण्यात आले आहे.त्या मुळे वाहनांचा लागला लांब रांगा देऊळगाव मही ते सरंबा पाट्या प्रयत्न रांगा लागला. युवकांनी पुरामुळे आटकलेल्या वाहन चालकांना नास्था व चहाची व्यवस्था केली रविभाऊ इंगळे,आकाश पेटकर,गणेश नागरे, विष्णू भुतेकर,शेख करीम, आचारी गजानन पंडित,समाधान पाबळे, राजू मुजमुळे,अंबादास पिसे,शरद इंगळे,आकाश गवते,आशोक शिंगणे, प्रभास राज्यसथान सीटमार्ट यांनी सहकार्य केले.