Home वाशिम भर पावसात ही शेतकरी ऊतरले रस्त्यावर ,

भर पावसात ही शेतकरी ऊतरले रस्त्यावर ,

163

 

विविध मागण्यांसाठी सोयाबीन उत्पादक शेतकऱ्यांचा भर पावसात जिल्हाधिकारी कार्यालयावर धडकला मोर्चा

फुलचंद भगत
वाशिम: सोयाबिन ऊत्पादक शेतकरी परतीच्या अति पावसाने हैरान झाले असुन पावसामुळे हातातोंडाशी आलेला घास निसर्गाने हिरावुन घेतल्यामुळे भर पावसात शेतकरी रस्त्यावर ऊतरले.दि.२८ रोजी वाशिम येथे विविध मागण्यांसाठी सोयाबीन उत्पादक शेतकऱ्यांचा भर पावसात जिल्हाधिकारी कार्यालयावर मोर्चा धडकला या मोर्चामध्ये हजारोच्या संख्येने शेतकरी सहभागी झाले होते.
सोयाबीनचा हंगाम जवळ आला आणि दहा हजाराचे दर पाच हजारांवर आले.त्यामुळं सोयाबीन उत्पादक शेतकरी संकटात सापडला आहे. सोयाबीन ला सरसकट 10 हजार रुपये दर मिळावे,हमीभावापेक्षा कमी दराने खरेदी करणाऱ्या व्यापाऱ्यांवर कारवाई व्हावी, जिल्ह्यात ओला दुष्काळ जाहीर करून नुकसान झालेल्या शेतकऱ्यांना भरीव मदत करावी या प्रमुख मागण्यासह शेतकऱ्यांच्या विविध मागण्यांसाठी वाशिम जिल्ह्यातील सोयाबीन उत्पादक शेतकरयांच्या वतीनं रस्त्यावर उतरून मोर्चा काढण्यात आला. स्थानिक शिवाजी चौकातून सुरू झालेला मोर्चा जिल्हाधिकारी कार्यालयावर धडकला यावेळी हजारो शेतकरी या मोर्चात सहभागी झाले होते. विशेष म्हणजे जोरदार पावसात ही आपल्या न्याय हक्कासाठी शेतकरी रस्त्यावर उतरून आपल्या मागण्याचे निवेदन जिल्हाधिकारी यांना देण्यात आले.