Home उत्तर महाराष्ट्र माहितीचा अधिकार लोकशाहीला बळकट करणारा कायदा .

माहितीचा अधिकार लोकशाहीला बळकट करणारा कायदा .

486

 रसूल येथील “माहिती अधिकार”कार्यशाळेत जनजागृती.

नाशिक – जेष्ठ समाजसेवक अण्णा हजारे यांच्या अथक प्रयत्नांतून झालेला माहिती अधिकार कायदा,लोकशाहीत जनतेच्या मूलभूत हक्कांसाठी आहे,सत्तेच्या विकेंद्रीकरनाला बळकटी देण्यासाठी आहे,माहिती अधिकार-२००५  सर्वांनी प्रभावीपणे वापरून आपल्या अधिकाराप्रति जागते राहील पाहिजे,असा सूर”जागतिक माहिती अधिकार दिनानिमित्त आयोजित हरसूल(ता त्रंबकेश्वर) येथील महात्मा गांधी विद्यामंदिर संचालित, कला, विज्ञान,वाणिज्य,महाविद्यालयात (दि.२८ रोजी) झालेल्या कार्यशाळेत व्यक्त झाला.यावेळी कोरोना नियमांचे काटेकोरपणे पालन करण्यात आले.

     यावेळी भ्रष्टाचार विरोधी जनांदोलनाचे जिल्हा पदाधिकारी निशिकांत पगारे व जेष्ठ ग्रामविकास अभ्यासक,पत्रकार राम खुर्दळ,यांनी हरसूल महाविद्यालयातील विध्यार्थ्यांसमोर “माहिती अधिकार”कायद्यांबाबत सविस्तरपणे मांडणी केली.या कायद्या अंतर्गत शासकीय,निमशासकीय कार्यालयात आपल्याला तपशीलवार

माहिती मिळू शकते,आपला देश व राज्य यातील व्यवस्थापन हे पारदर्शक राहील पाहिजे,यासाठी आपण माहिती अधिकाराचा निश्चित वापर करावा,जेष्ठ समाजसेवक अण्णा हजारे यांच्या राज्यभरातील भ्रष्टाचार विरोधी जण आंदोलनाला अधिक बळ मिळेल,आपल्या कष्टावर चालणाऱ्या शासकीय निमशासकीय कार्यालयातील माहिती जनतेला मिळणे हे आपले नागरी कर्तव्य,प्रभावी अस्र असल्याचे विचार भ्रष्टाचार विरोधी जण आंदोलनाचे निशिकांत पगारे यांनी व्यक्त केले.

तसेच यावेळी जेष्ठ ग्रामविकास अभ्यासक पत्रकार राम खुर्दळ यांनी”माहिती अधिकार-२००५”ह्या विषयाची सविस्तरपणे मांडणी केली,आदर्श गाव,आदर्श नगरे साकारण्यासाठी स्वच्छ कारभार हवा,त्यासाठी नागरिकांनी ही अधिक जागृतपणे माहिती मिळवण्यासाठी पुढे यावे,तसेच माहिती अधिकार अंतर्गत माहिती टाळाटाळ करणारे,तसेच चुकीची माहिती दिल्यास दंडात्मक कारवाई होते,त्यासाठी अपील करावे,अपिलात समाधान न झाल्यास राज्य माहिती आयुक्त यांचे मार्फत आपल्याला योग्य न्याय मिळतो,गोपनीय,शांतता भंग होणारी माहिती टाळण्यास मुभा आहे,मात्र जाणून बुजून माहिती देणे टाळता येत नाही,त्यावर माहिती मागणाऱ्यास अपील पर्याय आहे. माहिती हा नागरिकांचा मूलभूत अधिकार आहे,हे सर्वांनी समजून घ्यावे असे   त्यांनी सांगितले.यावेळी विद्यार्थ्यांना जेष्ठ समाजसेवक अण्णा हजारे यांची पुस्तिका भेट देण्यात आली,

या जागृती कार्यक्रमाचे प्रास्ताविक व आभार महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ.मोतीराम देशमुख,यांनी तर सूत्रसंचालन जेष्ठ साहित्यीक पत्रकार देवचंद महाले यांनी केले,यावेळी उपप्राचार्य एम पी पगार,पेठ येथील भ्रष्टाचार विरोधी जन आंदोलनाचे रमेश ठाकरे व विद्यार्थी यावेळी उपस्थित होते,

प्रतिक्रिया::-

देवचंद महाले (साहित्यिक) 

हरसुल सारख्या आदिवासी भागात विद्यार्थ्यांची जिज्ञासूंवृत्ती अधिक आहे,त्यांना मात्र पाठबळ व मार्गदर्शनाची माहितीची अधिक गरज आहे.याच कसोटीवर उतरून या भागात अधिक जागृती होणे गरजेचे आहे,याचाच एक टप्पा “माहिती अधिकार”कार्यशाळेने पार केला आहे.

प्रतिक्रिया:-

प्राचार्य डॉ मोतीराम देशमुख:-

आमच्या महाविद्यालयात “माहिती अधिकार”कार्यशाळा होणे आमचं भाग्य आहे,आणि अभ्यासू कृतिशील,साहित्यिक,सामाजिक क्षेत्रातील मंडळी महाविद्यालयात येऊन आमच्या विद्यार्थ्यांना ज्ञानामृत देतात हे प्रेरणादायी आहे,