एकुन 1196 रुपयाचा अवैध देशी दारुचा मुदेमाल जप्त
कुशल भगत – अकोट
अकोला / आकोट , दि. २२ :- तालुक्यातील ग्राम देवरी फाटा येथे एका खानावळ जवळ अवैध देशी दारू विक्री करत असल्याची गुप्त माहीती मीळाली होती या माहीती नुसार चौकशी केली असता आज दुपारी दोन वाजताया दरम्यान देवरी फाटा येथे एका खानावळ जवळ शुभम जगन्नाथ राऊत हा वय 21 वर्ष रा बोर्डी , हा इसम देवरी फाटा येथे एका खानावळ च्या बाहेर अवैध देशी दारु ची विक्री करत होता त्याला आज रंगेहाथ पकडुन दहीहांडा पोलीस स्टेशन येथे गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
सदर पुढील तपास ठाणेदार प्रेमानंद कात्रे याच्या मार्गदर्शनात हे कॉ अरून घोरमोळे पांतोड विजय सौदेगर करीत आहेत.