Home बुलडाणा साहेब रविवार बंद च्या आदेशाचा काय झालं हो , ???

साहेब रविवार बंद च्या आदेशाचा काय झालं हो , ???

462

 

 

  • साहेब रविवार बंद च्या आदेशाचा काय झालं हो , ???

 

आज बुलडाणा , देऊळगावमही , मेहकर येथे भरले मोठे आठवडी बाजार 

 

जिल्हाधिकारी साहेबांच्या आदेशाला स्थानिक प्रशासनाची अनदेखी ,

 

बुलडाणा , प्रतिनिधी

कोविड संसर्गाच्या तिसऱ्या लाटेचा धोका लक्षात घेता राज्य शासनाने व जिल्हा प्रशासनाने काही निरबंध लागू केलेले आहेत या संदर्भात मा , जिल्हाधिकारी साहेबांनी शनिवारी दुपारी तीन नंतर सर्व प्रतिष्ठाने बंद व रविवारी दिवस भर सर्व बंद चे आदेश काढलेले आहेत मात्र काल शनिवार ला जिल्ह्यात सर्वच ठिकाणी सर्व वयव्हार सुरळीत सुरू होते तर आज जिल्ह्यात देऊळगावराजा तालुक्यातील देऊळगाव मही , मेहकर व जिल्हा मुख्यालय असलेला बुलडाणा येथे मोठे आठवडी बाजार भरले असून याकडे स्थानिक संबंधित प्रशासन डोळेझाक करीत असल्याचे स्पष्ट दिसत आहे ,

राज्य शासनाने व जिल्हा प्रशासनाने वाढत्या कोरोनाच्या उद्रेकामुळे महाराष्ट्र्रासह बुलडाणा जिल्ह्यात निर्बंध लागू केले आहेत त्यात होणाऱ्या गर्दी मूळे आठवडी बाजार पूर्णतः बंद करण्यात आलेले असतांना शनिवार व रविवारला विकेंड लॉकडाऊन हा जिल्हाधिकारी यांनी आदेश काढून घोषित केला आहे मात्र त्या आदेशाची एकप्रकारे पायमल्ली करीत आज देऊळगाव मही , बुलडाणा , मेहकर येथे मोठे आठवडी बाजार भरले असल्याचे आमच्या स्थानिक प्रतिनिधीनि कळविले आहे , बाजारात लोकांची एकच गर्दी झालेली दिसुन येत आहे दुकानदार व ग्राहकांनी कुठल्याही प्रकारे मास्क चा वापर करीत नसल्याचे चित्र आज सर्व बाजारात दिसून येत आहे सोशल डिस्टनसिंग नियमांचे तिनतेरा वाजल्याचे दिसुन येत आहे जिल्ह्यात नविन कोरोना रुग्णाची संख्या जरी कमी असली तरी कोरोनाचा धोका मात्र कायम असुन तो शासनाच्या नियोजन शून्य कारभाराचा एक भाग आहे, तिसऱ्या लाटेचा धोखा ही कायम आहे अश्यातच लोकांची होणारी गर्दी टाळणे हे प्रशासनाचे काम आहे मात्र प्रशासन हे उघड्या डोळ्यांनी सर्व काही पाहत असून लोकां पुढे हातबल झाल्याचे दिसत आहे ,

 

मंत्री महोदयांच्या सुचने कडे अधिकाऱ्यांचे दुर्लक्ष ,

करोना संसर्गाचा धोका पाहता जिल्ह्याचे पालकमंत्री डॉ , राजेंद्र शिंगणे साहेब यांनी परवालाच सर्व अधिकाऱ्याची एक बैठक घेऊन राज्य शासनाच्या आदेशाची कडक अंमलबजावणी करण्याचे सूचित केले होते मात्र मंत्री महोदयांच्या सुचने कडे ही अधिकारी वर्गाने दुर्लक्ष केल्याचे दिसून येत आहे ,

आठवडी बाजार बंद चे आदेश असतांना भरतात कसे ?

जिल्हाधिकारी साहेब यांचे आदेशाला डावलून आज देऊळगाव मही , मेहकर , बुलडाणा येथे मोठे आठवडी बाजार भरत असून लोकांची एकच गर्दी होत आहे त्या मुळे कोरोना संसर्ग वाढन्याची भीती वयकत केली जात आहे , जिल्हाधिकारी साहेबाच्या आदेशाची अंमलबजावणी करण्याचे काम तहसिलदार व गटविकास अधिकारी न , प , चे मुख्याधिकारी यांची आहे मात्र ते ही उघळया डोळ्यांनी हे सर्व बघून याकडे डोळे झाक करीत आहे तरी जिल्हा प्रशासनाने त्वरित या गंभीर बाबी कडे लक्ष केंद्रित करून कार्यवाही करावी अशी मागणी काही सुज्ञ नागरिक करीत आहे ,